ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काश्मीरमधील पेहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ, बुधवारी कल्याण शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी केंद्र सरकार व गृहमंत्रालयाने राष्ट्रीय सुरक्षेत दाखवलेल्या हलगर्जीपणा बद्दल गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची ठाम मागणी करण्यात आली. आंदोलनावेळी शिवसैनिकांनी भारत माता की, जय वंदे मातरमचा जयघोष केला व पाकिस्तान आणि दहशतवाद्यांच्या निषेधाच्या घोषणाबाजी केली.
या आंदोलनात उपनेते विजय साळवी, उपनेते अल्ताफ शेख, कल्याण पूर्व विधानसभा संघटक नारायण पाटील , शिवसेना कल्याण शहरप्रमुख बाळा परब, विधान सभा शहर संघटक रूपेश भोईर, आणि कल्याण शहरातील समस्त शिवसैनिक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, युवासेना आणि शिवसेना महिला आघाडी हे सर्व यावेळी उपस्थित होते.
.jpg)

Post a Comment
0 Comments