Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अमली पदार्थ प्रकरणात कोळशेवाडी पोलिसांची मोठी कारवाई

 

दोघांकडून  कोडेन फॉस्फेट सिरप व गोळ्याचा साठा जप्त

                ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
पोलीस उपायुक्त परिमंडळ ३, कल्याण यांच्या आदेशानुसार कोळसेवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदेशीर अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून कोडेन फॉस्फेट सिरप व अल्पझोलाम गोळ्याचा साठा हस्तगत करण्यात आला असून, या कारवाईमुळे स्थानिक गुन्हेगारी नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे.

कोळसेवाडी पोलीस पथक मॉल परिसरात २२ एप्रिल  रोजी  २.३० वा. दरम्यान गस्त घालत असताना, मेट्रो मॉल समोर सार्वजनिक रस्त्यावर रिक्षा स्टॅन्ड जवळ उभी असलेल्या रिक्षात दोन संशयित व्यक्ती आढळून आल्या. या मध्ये मोहम्मद रफीक अब्दुल सलाम वय ४६ वर्ष व अब्दुल सादिक अब्दुल कलाम शेख वय ४८ वर्ष दोघेही राहणार कुरेशी नगर, कुर्ला हे बसलेले होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी पंचासमक्ष तपासणी केली असता, त्यांच्या ताब्यातील सॅगबॅगमधून कोडेन फॉस्फेट सिरप, अल्प्राझोलाम ५ मी. ग्रॅ. व अल्प्रतन गोळ्या असा एकूण २७ हजार ८० रुपये किंमतीचा अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला. 

या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस. ॲक्ट १८८५ अंतर्गत कलम ८(क) ,२२ (ब) ,२९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आले आहे. ही विशेष कारवाई  पोलीस उप आयुक्त  अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गणेश न्ह्यायदे, निरीक्षक संभाजी नाईक, अनिल गायकवाड, जितेंद्र ठोके तसेच पोलीस पोलीस शी. अमित शिंदे, खुशाल नेरकर ,राहुल शिंदे यांच्या पथकाने सदर कारवाई केली असून , या उत्कृष्ट कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


Post a Comment

0 Comments