Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मुख्याध्यापक सहविचार सभेत अनेक विषयांवर सखोल चर्चा

    

ठाणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक 

मुख्याध्यापक संघ शिक्षण विभाग माध्यमिक

जिल्हा परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने

आयोजन

                      ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार   ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली  ठाणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्याध्यापक सहविचार सभा महात्मा गांधी विद्यालय अंबरनाथ येथे शनिवारी उत्तमरित्या पार पाडण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करत असताना शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या संबंधित आधार व्हॅलिडेशन, अपार आयडी जनरेशन, निपुण भारत अंतर्गत एफएलएन कार्यक्रम, संच मान्यता स्कॉफ पोर्टलवर  माहिती भरणे, तसेच शाळांच्या प्रशासकीय व आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी उपाययोजना अशा अनेक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

यावेळी ठाणे जिल्हा माध्य.शिक्षणाधिकारी ललिता दहितुले,   शिक्षणाधिकारी लेखाधिकारी दिलीप घनगाव, उपशिक्षणाधिकारी मोहिते, संदीप पाटील,महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन सदस्य प्रशांत भामरे, शिक्षण उपनिरीक्षक उपसंचालक कार्यालय भक्ती गोरे हे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गणेश पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले.

ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रवीण लोंढे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ मुंबई  विभागीय अध्यक्ष अनिल पाटील, अंबरनाथ तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष पंजाबराव बडगे, सचिव विजय राणे व  मुख्याध्यापक संघाच्या सर्व जिल्हा कार्यकारी पदाधिकारी तसेच सर्व तालुका कार्यकारी पदाधिकारी  यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. दिलीप कणसे, संतोष बनगे यांनी कार्यक्रमासाठी सभागृहाची व्यवस्था निशुल्कपणे करून दिली. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शिक्षणाधिकारी ललिता दहितुले, लेखाधिकारी दिलीप घनगाव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.


Post a Comment

0 Comments