Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

राज्य पेसा संचालकांचा ठाणे जिल्ह्यात पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींचा दौरा

 

                  ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर-

 दिनांक 08 व 09 एप्रिल, 2025 रोजी, राज्य पेसा कक्ष, ग्राम विकास विभाग, पुणे येथील संचालक शेखर शंकर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींचा क्षेत्रीय दौरा यशस्वीरित्या पार पडला.

यामध्ये जिल्हा परिषद, ठाणे येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, राज्य पेसा समन्वयक अतुल गाडे, जिल्हा व्यवस्थापक संजय धसाडे, सर्व तालुका व्यवस्थापक (पेसा) तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पेसा कायदा 1996 अंतर्गत तयार करण्यात आलेल्या पेसा नियमांची अंमलबजावणी, तसेच पेसा 5% थेट निधी बाबत सविस्तर आढावा घेण्यात आला आणि अंमलबजावणी प्रक्रियेतील अडचणी व उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली.

या दौरा दरम्यान  ग्रामपंचायत शिरोळ (ता. शहापूर) येथे क्षेत्रीय भेट घेण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करून संचालकांचे स्वागत केले. यानंतर ग्रामसभा, विविध समित्यांसोबत संवाद साधून पेसा कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच 5% थेट निधी योजनेअंतर्गत ग्रामनिहाय दप्तर तपासणी व प्रत्यक्ष कामांची पाहणी देखील करण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायत कसारा खुर्द येथे भेट देऊन संचालक यांनी ग्रामसभा कोष समिती सदस्यांसह चर्चा केली. या वेळी संबंधित योजनेचे सर्व अभिलेख, नोंदवह्या आणि प्रत्यक्ष कामांची तपासणी करण्यात आली.

 या दौऱ्यात गटविकास अधिकारी कल्याण पंडित राठोड, तालुका स्तरीय विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.हा दौरा पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीस चालना देणारा ठरला असून, पेसा क्षेत्रातील विकास प्रक्रियेला बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे.

000

Post a Comment

0 Comments