ठाणे जिल्ह्याची महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात मोठी झेप
ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या "लखपती दीदी" योजनेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील उद्दिष्टांची 100% पूर्ती करण्यात आली असून, एकूण 46399 स्वयंसहाय्यता गटांतील महिलांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांहून अधिक झाले आहे व याची नोंदणी Digital Aajeevika Register (App) मध्ये करण्यात आलेली आहे.
या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील गरिब महिलांना किमान दोन उपजिविकेची साधने उपलब्ध करून देत त्यांचे कुटुंब दरवर्षी 1 लाखापेक्षा अधिक उत्पन्नाचे स्त्रोत गाठेल यासाठी आहे. महिलांना व्यवसायिक प्रशिक्षण, कर्ज व आर्थिक पाठबळ, डिजिटल नोंदणीसह आर्थिक साक्षरता कार्यशाळा यांचे नियोजन उमेद अभियानांतर्गत यशस्वीपणे राबविण्यात येत आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी दिली.
उमेद अभियानाचे उद्दिष्टः
“तळागाळातील गरिबांसाठी मजबूत अशा संस्थांची बांधणी करुन, स्वंयरोजगार व कुशल वेतनाधारित रोजगाराच्या संधी मिळवून दारिद्र्य निर्मूलन व उपजिविकेत शाश्वत सुधारणा करणे.”
ठाणे जिल्ह्यातील लखपती दीदी योजनेची उद्दिष्टपूर्ती (24-25):
या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, "उमेद अभियानांतर्गत राबविण्यात येणारी लखपती दीदी योजना ही केवळ महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणारी योजना नसून, ग्रामीण भागातील कुटुंबांची जीवनशैली बदलणारी शक्ती आहे. शेती आधारित, बिगर शेती आधारित, पशुपालन, समुदाय गुंतवणूक निधी, जोखीम प्रवणता निधी, उत्पादक गट स्थापना तसेच SVEP - Startup Village Enterpreneurship Programme शहापूर तालुक्यात तर MED - Micro Enterprise Development अंबरनाथ तालुक्यात या योजना राबवून ठाणे जिल्ह्यात १००% लखपती दीदी करण्यात यश मिळाले आहे."
उमेद अभियानांतर्गत महिलांचे संघटन, उत्पादक गट, महिला शेतकरी उत्पादक कंपन्या यांची यशस्वी स्थापना व संचालन करण्यात येत असून, प्रशिक्षित समुदाय संसाधन व्यक्तींच्या माध्यमातून गावपातळीवर कार्यरत राहून गरीब महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्य केले जात आहे.
000
.jpg)


Post a Comment
0 Comments