ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वार्ताहर
15-एप्रिल जागतिक कला दिवस आणि भारतीय चित्रकार आनंदकिशोर मेहर यांचा 50वा वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी..चित्रकार आणि हौशी कलाकार मित्रांना दिले "संयुक्त राष्ट्र अमेरिकेतील "न्यूयॉर्क' शहरात चित्रप्रदर्शनाची विनामूल्य संधी उपलब्ध करून दिली आहे
प्रत्येक कलाकारांची मनस्वी इच्छा असते आपले देशात आणि परदेशात चित्रप्रदर्शन व्हावे. किंवा गोव्यासारख्या समुद्र किनारी जाऊन निसर्ग आणि कलेचा मनसोक्त आस्वाद घ्यावा.
तीच कलाकारांची मानसिक गरज लक्षात घेता चाइल्डआर्ट प्रॉडिजी फाउंडेशन आणि कलाआनंद फाऊंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त संकल्पनेतून उन्हाळ्याच्या सुट्टीत 3-4-5 में, 2025 रोजी
गोवा येथे तीन दिवस कलाआनंद कार्यशाळा किंवा (संयुक्त राष्ट्र अमेरिका) "न्यूयॉर्क शहरात" चित्रप्रदर्शन भरविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
प्रत्येक सहभागी कलाकारांना सहभाग प्रमाणपत्र आणि न्युयॉर्क शहराच्या मॅग्झीन मध्ये नावांचा उल्लेख असलेला लेख असेल. कलाकारांच्या कलाकृती आयोजक घेऊन जातील.सेल झाल्यास पैसे कलाकारांना आणि सेल न झाल्यास कलाकृती परत मिळतील.
अमेरिकेतील पर्यटनासाठी आणि कधीही न झोपणारी राजधानी चे शहर "न्यूयॉर्क सिटी" प्रसिद्ध आहे. अश्या सुंदर आणि जगप्रसिध्द शहराच्या कलादालनात आपल्याला आपली कलाकृती प्रदर्शित करण्याची संधी आहे.
गोव्याच्या सुप्रसिद्ध "आराम बोल बीच" येथील स्वाती रिसाॅर्ट मध्ये दिनांक 3- 4 आणि 5-में, 2025 या शनिवार, रविवार आणि सोमवारी या तीन दिवसीय उन्हाळ्याच्या सुट्टीत कलाआनंद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.या तीन दिवसीय व दोन रात्रीच्या समुद्र किनारी "कलाआनंद कार्यशाळेत" तुम्हाला मिळणार.
अधिक माहितीसाठी संपर्क...आनंदकिशोर मेहर..9320265626
(
.jpg)

Post a Comment
0 Comments