Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण डोंबिवली महापालिका कार्यालयात शुकशुकाट

शासकीय सुट्ट्यांचा सर्वसामान्य करदात्या नागरिकांना            

 मोठा फटका, प्रशासकीय कामे खोळंबली

                ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

सर्वसामान्य नागरिकांना स्मार्ट सिटी चे स्वप्न दाखवणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालया मध्ये ह्या आठवड्यात आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे अनेक विभागांच्या कार्यालयांमध्ये    शुकशुकाट दिसून आला आहे.१८-१९-२०-सलग सुट्ट्या आल्याने महापालिका कार्यालयांमध्ये प्रमुख अधिकारीवर्ग रजेवर गेलेले आहे.सर्वसामान्य नागरिक रखरखत्या उन्हामध्ये आपल्या विविध कामांसाठी महापालिकेच्या विविध विभागांच्या कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना भेटायला गेले असता अधिकारी सोमवार शिवाय भेटू शकत नाही  असे सांगितले जात आहे.

सामान्य प्रशासनाचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे-अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड-सहाय्यक सिटी इंजिनियर जगदीश कोरे-सहाय्यक संचालक, कल्याण पश्चिम डोंबिवलीतील इतर अनेक मुख्य अधिकारी शुक्रवार पासून महापालिकेत नाही.असे आढळून आले आहे.

सार्वजनिक सुट्ट्या असल्यामुळे अनेक सर्वसामान्य नागरिक, वयोवृद्ध, महिला पुरुष सर्वांच्याच शासकीय कामांमध्ये व्यत्यय आला असून,भर उन्हामध्ये महापालिकेत फुकटच्याच चकरा माराव्या लागल्या आहेत. 

सार्वजनिक सुट्ट्यांच्या बाबतीत शासनाने पुन्हा एकदा विचार करणे आवश्यक आहे असे वाटते.शासन निर्णयानुसार पाच दिवसांचा आठवडा असे धोरण ठरलेले असतांना , सलग येणाऱ्या सुट्ट्यांच्या बाबतीत नवनियुक्त आयुक्त अभिनव गोयल यांनी याकडे वैयक्तिक लक्ष देऊन सर्वसामान्य नागरिकांना प्रशासकीय कामांत होणारा त्रास थांबवावा आणि सलग सुट्ट्यांचा मनमुराद आनंद घेणाऱ्या अधिकाऱ्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देत,योग्य ती समज द्यावी, आणि नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments