वाहतुक कोंडीत बसेस
अडकल्याने शाळेला दिली सुट्टी
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण - शीळ रोडवर सकाळ पासूनच वाहतूक कोंडी झाल्याने याचा फटका नागरिकांना सोबतच विद्यार्थ्यांनाही बसला आहे. विद्यार्थ्यांना सकाळी जाण्यासाठी तब्बल दोन तास लागेल, त्यामुळे दुपारी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुट्टी दयावी लागली. ऐन परीक्षेच्या तोंडावर शाळा बुडत असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
वाहतूक कोंडीमुळे कल्याण, डोंबिवलीकर नागरिक हैराण झाले असतांना याच विषयावरून सत्ताधारी प्रशासनावर समाज माध्यमातून टीका केली जात आहे. यातच आता मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी बोला'नाथ' किती वर्ष आश्वासन देतो, विकासाचे रोज रोज तेच भाषण देतो !….. अशी एक्स पोस्ट करत ही परिस्थिती लवकर सुधारली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता तरी प्रशासन लक्ष देणार का हे पहावे लागले.
कल्याण तळोजा मेट्रॅा ना येथील नागरिकांच्या फायद्यासाठी आहे ना या परिसरातील विद्यार्थ्यांच्या. ही मेट्रॅा फक्त आणि फक्त बिल्डरांच्या फायद्यासाठी व या प्रकल्पातून मिळणाऱ्या टक्केवारीसाठी येथे आणली आहे. एकीकडे कल्याण-शीळ रस्त्याच्या तिसऱ्या मार्गीकेचे भूसंपादन झाले नाही, दुसरीकडे ठेकेदारांना द्यायला पैसे नाहीत म्हणून पलावा पुल रखडला आहे. तरीही या प्रकल्पाचेही पुर्ण भूसंपादन झाले नसताना लोकसभेच्या तोंडावर लोकांना खोटा विकास दाखविण्यासाठी काम सुरू करण्यात आले.
या ‘बिल्डरांच्या मेट्रॅासाठी’ विद्यार्थी, पेशंट, नोकरदार वर्ग व सर्वसामान्य नागरिकांना वेठीस ठेवण्याचे काम सुरू आहे. आज या कामांमुळे होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीमूळे काही शांळाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या याचे कोणालाच सोयरसुतक नाही ? आमचे पालकमंत्री तर फक्त बालकाच्या कार्यक्रमाला सायरन वाजवत येतात, इतर वेळी त्यांनाही काही पडली नाही. खरंतर या अनागोंदीला त्यांचाच इतक्या वर्षातला विकासाच्या नावाने चाललेला हा गोंधळ कारणीभूत आहे. ही परिस्थिती लवकर सुधारली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा राजू पाटील यांनी दिला आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments