Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

इराणी वस्तीमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर



"आंबिवली येथील इराणी वस्तीवर

 चालणार बुलडोझर"

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

             ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण आंबिवली परिसरामध्ये राहणाऱ्या इराणी वस्तीमधील एका चोराचा चेन्नई मध्ये एन्काऊंटर करण्यात आला आहे. विमानाने परराज्यात दरोडे टाकण्यासाठी जाऊन चोरी करणाऱ्या टोळीतील एकाचा चेन्नई पोलिसांनी एन्काऊंटर केला तर दोघेजन गंभीर जखमी झाले आहेत. विविध गुन्ह्यामध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेले हे गुन्हेगार आहेत. तर इराणी वस्तीतील गुन्हेगारांचा सातत्याने होणारा त्रास लक्षात घेता आंबिवली येथील इराणी वस्तीवर बुलडोझर चालवणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिली आहे.

कल्याण आंबिवली परिसरामध्ये इराणी वस्ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या इराणी वस्तीमध्ये सोन साखळी चोरी सह इतर चोऱ्या करणाऱ्या आरोपींचे आंबिवली हे माहेरघर आहे.  महाराष्ट्र पोलिसांनी या चोरांच्या मुसक्या आवळल्या असून अनेकांना जेल मध्ये टाकले आहे.  मात्र हे चोर परराज्यात विमानाने प्रवास करत चोऱ्या करत असल्याचे उघड झाले आहे.

सलमान मेश्राम, अमजद इराणी, जाफर गुलाम हुसेन इराणी, महाराष्ट्रातून इतर राज्यांमध्ये विमानाने जाऊन चोऱ्या करत आहेत. काल चेन्नई मध्ये हे आरोपी चोरी करण्यासाठी गेले असता   चेन्नईमध्ये दहा किलो सोनं चोरी करून जात असताना चेन्नई पोलिसांच्या झटापटीमध्ये जाफर गुलाम इराणी या चोराचा चेन्नई पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे.  यात सलमान मेश्राम, अमजद इराणी हे जखमी झाले आहेत. कल्याण आंबिवली वरून चेन्नईला नातेवाईक मृतदेह आणण्यासाठी रवाना झाले आहेत.

तर कल्याण नजीकच्या आंबिवली येथील इराणी वस्तीतील गुन्हेगारांचा सातत्याने होणारा त्रास लक्षात घेता सदर इराणी वस्तीवर कारवाई करण्याची मागणी सातत्याने होत असताना अटाळी गावातील प्रथमेश पाटील यांनी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून या इराणी वस्तीवर बुलडोझर चालवण्यात यावा अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने दिनांक 26 मार्च  रोजी अर्थसंकल्प अधिवेशनात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी इराणी वस्तीत मोठं कोंबिंग ऑपरेशन करून सर्व गुन्हेगारांना शोधून काढून  या इराणी वस्तीवर बुलडोझर चालवणार असल्याची माहिती दिली.

 


Post a Comment

0 Comments