ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर
डोंबिवली विधानसभा मतदार संघांचे आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत खाडीकिनारा आणि परिसर स्वच्छ व मनमोहक व्हावा या उद्देशाने करोडो रुपयांचा स्वतःचा निधी जुनी डोंबिवली विभागात विकासकामांकरिती खर्ची केला. यातून जुनी डोंबिवली गणेशघाट व अंडर बायपास ते गणेश घाट जोड रस्ता काँक्रिट रस्त्याची निर्मिती झाली. या दोन्ही विकास कामांचे उदघाटन आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले.
सदर लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व महिलांसाठी विविध खेळ, बक्षिसे आणि नऊवारी नेसून येणाऱ्या महिलांसाठी आकर्षक खास बक्षिस ठेवण्यात आले होते. रस्त्याच्या उद्घाटनप्रसंगी भाजपचे कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे, कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर (नंदू) परब, डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष समीर चिटणीस, ग्रामस्थ दीपक ठाकूर, डोंबिवली पश्चिम मंडल उपाध्यक्ष कृष्णा पाटील, रसिका कृष्णा पाटील, कल्याण जिल्हा युवा मोर्चा सचिव योगेंद्र भोईर यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे लोकसेवेकरता सतत काम करत आहे.कष्टकरी, शेतकरी व समाजातील प्रत्येक घटकाच्या समस्या सोडविण्यासाठी ते कटीबंध आहे.वेगवेगळ्या विकासकामाच्या माध्यमातून व मेट्रोचे जाळे सर्वत्र पसरावे यासाठी त्यांचा प्रयत्न आहे.त्याचबरोबर 720 किलोमीटरचा कोकणातील समुद्रकिनारा व त्याजवळील खाडीपरिसर याला सुद्धा शुशोभिकरण करण्याकरता संबंधित खात्याच्या माध्यमातून 2014 पासून आतापर्यंत प्रयत्न हे महायुतिच्या माध्यमातून केले गेले.जुनी डोंबिवलीतील भव्य अशा कामाचे लोकापर्ण झाले आहे.महायुतिच्या सर्व नेत्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद करतो.
---भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण
भाजप प्रदेश कार्याध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विशेष निधीतून जुनी डोंबिवली परिसरात काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी रस्त्याचे उद्घाटन केले. जुनी डोंबिवली अंडरपासकडून गणेश घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था वाईट झाली होती. खराब रस्त्यामुळे अंडरपासमधून गणेश घाटाकडे जाणाऱ्या वाहन चालकांना व नागरिकांना त्रास होत होता. स्थानिक भूमिपुत्र आणि जुनी डोंबिवलीतील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन आमदार व माजी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विशेष निधीतून नवीन काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. परिणामी काँक्रीटचा मजबूत रस्त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान मूर्ती विसर्जनासाठी जाणाऱ्या वाहनचालकांना तसेच गणेशभक्तांना दिलासा मिळणार आहे. सूत्रसंचालनाची जबाबदारी विवेक पोरजी यांनी सांभाळली.
.jpg)





Post a Comment
0 Comments