ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज दि.८मार्च २०२५, शनिवार रोजी सकाळी ९ ते११ या वेळेत महिला दिन जिल्हा परिषद शाळा काटई, केंद्र खोणी, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथे उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला डॉ. सौ. मेघा पाटील,सौ.रजनीताई वाघमारे, सौ. रजनी पाटील यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच दीप प्रज्वलन संपन्न झाले.
शाळेतील विद्यार्थिनींनी *स्वागतगीत व ईशस्तवन* सादर केले. उपस्थितांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने देण्यात आलेला राज्यस्तरीय पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला आहे अशा डॉ.सौ.मेघा पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र गोळवली यांना शाळेच्या वतीने आमंत्रित करण्यात आले होते.त्यांचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला. आजच्या काळातील अत्यंत महत्त्वपूर्ण विषय *महिलांचे आरोग्य* त्यांनी पीपीटीच्या माध्यमातून स्पष्ट केल्याने तो अधिक प्रभावीरित्या महिलांपर्यंत पोहोचला.
सौ. श्रद्धा सांगळे अंगणवाडी सेविका, काटई यांनी *सुनीता विल्यम्स* यांचे महान कार्य उपस्थिततांसमोर सहज , सोप्या आणि ओघवत्या शैलीत विशद केला.
आजच्या कार्यक्रमाच्या महत्त्वपूर्ण उद्देश म्हणजे निपुण भारत.
या अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित माहिती शाळेतील शिक्षिका सौ. माधुरी पाटील यांनी दिली. त्याच अनुषंगाने माता पालक गटातील यशस्वी कामगिरी करणाऱ्या *महिलेचा पुष्प देऊन सन्मानही* करण्यात आला.
आजच्या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे महिलांसाठी उखाणे आणि संगीत खुर्ची अशा दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये सर्व महिलांनी उत्साहाने भाग घेऊन बक्षीसे पटकावली.
सदर कार्यक्रमासाठी श्री. गंधारजी कुलकर्णी, कॅटरर डोंबिवली यांच्या सौजन्याने उपस्थिततांसाठी अल्पोपहार देण्यात आला. त्यांच्या आईच्या वाढदिवसा प्रित्यर्थ शाळेसाठी चार पंखे देखील त्यांनी दिले.
या कार्यक्रमाचे आयोजन,नियोजन व सूत्रसंचलन शाळेच्या शिक्षिका सौ.संगीता ठुबे यांनी यशस्वीरित्या केले.
सदर महिला दिनानिमित्त शाळा व्यव.समितीच्या सदस्य सौ. रजनी ताई वाघमारे, सौ. रजनीताई पाटील, सौ.छाया झालटे, सौ. मेघा पाटील अंगणवाडी सेविका ,सौ. श्रद्धा सांगळे अंगणवाडी मदतनीस, सौ. रत्ना फुटाणे सौ. साधना फुटाणे, पालकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
*महिलांप्रती आदर निर्माण व्हावा आणि हा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवाण्याच्या दृष्टीकोनातून* जाणीवपूर्वक ह्याची जबाबदारी आज आमच्या शाळेतील विद्यार्थी आदित्य चव्हाण व आकाश खवणेकर यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत पुष्पवृष्टी करून केले.
अशा रीतीने शासकीय आदेशानुसार महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
.jpg)



Post a Comment
0 Comments