ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण मध्ये कर्णिक रोड ,येथे हॉलिक्रॉस हॉस्पिटल समोरील इमारतीत सह दुय्यम निबंधक वर्ग २ कार्यालय सुरू असून, सदर कार्यालयात शहरातील असंख्य नागरिक रोजच्या रोज मोठ्या संख्येने कार्यालयीन कामासाठी सकाळ पासून रात्री पर्यंत येत असतात,ह्या कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी होत असते.अशा वेळी नागरिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. विशेषतः महिला,वयस्क व्यक्तींना सदर कार्यालयात तासंतास थांबावे लागते.जितक्या संख्येने नागरिक रोजच्या रोज येतात त्यामानाने तिथे सोयी सुविधा उपलब्ध नाही.नागरिकांना बसायला जागा अपुरी पडते, साधी स्वच्छता गृहाची सुविधाही उपलब्ध नाही.अशा वेळी महिला आणि वयस्कांची खूपच कुचंबणा होत असते.अशा तक्रारी नागरिकांकडून वारंवारं केल्या जात आहे, परंतू प्रशासन काहीच उपाय योजना करत नाही.
प्रत्यक्ष पाहणी केली असता तेथील दुरावस्था खरंच दिसून आली.सदर कार्यालयात पार्टीशन घालून अर्धी जागा महसूल विभागाच्या कार्यालय साठी दिली आहे तिथे दिवस भरात मोजके एक किंवा दोन तीन कर्मचारी येतात.नागरिकांची कोणतीही वर्दळ तिथे नसते.
सदर जागेची आवश्यकता खरं तर निबंधक कार्यालयात मोठ्या संख्येने येणाऱ्या नागरिकांना होऊ शकतो, परंतू शासनाने इतकी मोठी जागा महसूल खात्याला देऊनही त्या जागेचा वापर होतांना दिसत नाही.तलाठी कार्यालयासाठी दिलेल्या जागेत आजपर्यंत कोणीही फारसे येतांना दिसत नाही. प्रत्यक्ष पाहणी केली असता रिकामे असलेल्या तलाठी कार्यालयात कोणीही नसल्याचे दिसून आले.आता प्रश्न विचारला जात आहे की ही जागेचा वापर उपनिबंधक कार्यालयाला का करू दिला जात नाही.ज्या सरकारी कार्यालयात मोठ्या संख्येने नागरिकांचा राबता असतो तिथे नागरिकांना प्राथमिक सुविधा उपलब्ध का होऊ शकत नाही.ज्या नागरिकांकडून शासनाला लाखों रुपयांचा कर रूपात महसूल मिळतो त्याच सरकारी कार्यालयात नागरिकांची हेळसांड होतांना दिसत आहे.पालिका प्रशासनाने आणि महसूल खात्याच्या वरिष्ठांनी त्वरित यावर तोडगा काढावा.अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
.jpg)





Post a Comment
0 Comments