ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
जागतिक महिला दिनी कल्याण डोंबिवली महापालिकेचा आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि रिजेन्सी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी कल्याण पूर्व नेतिवली येथील प्रबोधनकार ठाकरे शाळेत “मिशन रक्षा” या अभिनव उपक्रमांतर्गत 9 ते 14 वयोगटातील शालेय विद्यार्थीनीना गर्भाशय मुखाची कर्करोग प्रतिबंधक लस देण्यात आली. महानगरपालिकेने “मिशन रक्षा” या नव्या उपक्रमास प्रारंभ केला असून गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी शालेय विद्यार्थींनीच्या पालकांमध्ये कर्करोग प्रतिबंधासाठी जनजागृती करून सदर लस विद्यार्थींनीना देण्यासाठी त्यांच्या पालकांचे संमती पत्र घेवून सदर लस प्रबोधकार ठाकरे शाळेतील एकूण 84 मुलींना देण्यात आली.
आज भारतात बरेचशे मृत्यु हे ब्रेस्ट कॅन्सर व सर्वायकल कॅन्सर मुळे होत आहेत आणि आता सर्वायकल कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी लस उपलब्ध झाली असून ती आपण 09 वर्ष वयोगटापासून 14 वर्ष वयोगटाच्या मुलींना देवू शकतो. सीएसआर फंडाच्या माध्यमातून ही लस महापालिकेस उपलब्ध झालेली असून उपलब्ध लस टप्प्याटप्प्याने महापालिकेच्या इतर शाळांमधील शालेय विद्यार्थीनीना दिली जाईल अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी या कार्यक्रमावेळी दिली.
यावेळी महापालिकेच्या वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. दिपा शुक्ल, वैद्यकिय अधिकारी सुहासीनी बडेकर, डॉ. विनोद दौंड, डॉ. प्रज्ञा टिके इतर वैद्यकीय अधिकारी तसेच आयएमए कल्याण च्या अध्यक्षा डॉ. सुरेखा इटकर, आयएमए डोंबिवली च्या पदाधिकारी डॉ. निती उपासनी, महापालिका उपायुक्त संजय जाधव, महापालिका शिक्षण अधिकारी विजय सरकटे, इतर अधिकारी, शिक्षक वर्ग व मुलींचे पालक तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आशा वर्कर्स ,ए एन एम उपस्थित होत्या.
.jpg)


Post a Comment
0 Comments