Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

फांगणे येथे भव्य मिरवणूकीत हरिनामाचा जयघोष करत आजीबाई शाळेचा दशक पूर्ती सोहळा संपन्न !

 

               ब्लॅक अँड व्हाईट मुरबाड -प्रतिनिधी

जगप्रसिद्ध आजीबाई शाळा मुरबाड तालुक्यातील फांगणे येथे दशक पूर्ती सोहळा दिमाखदार रितीने साजरा झाला.

         शिक्षणाला  वयाचे बंधन नसते हे तत्व  जगाला दाखवून देणा-या आजीबाई शाळा फांगणे यांनी   दहा वर्षे पूर्ण केल्या बद्दल  भव्य सोहळ्याचे आयोजन फांगणे गावी करण्यात आले होते.कै.मोतीराम गणपत दलाल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून समाज सेवक दिलीप दलाल यांच्या योगदानातून इतिहास संशोधक, योगेंद्र बांगर यांनी आजीबाई शाळेचा शुभारंभ  केला.शितल  मोरे यांनी या आजीबाईंना ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. देशविदेशातील अनेक पत्रकार, मान्यवरांनी  येऊन या शाळेचे कौतुक केले आहे. तसेच महागणपती हास्पिटल टिटवाळा यांच्या वतीने आयोजित भव्य आरोग्य शिबिराचा महिला व आजीबाईंनी लाभ घेतला.

कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात महानायक  अमिताभ बच्चन यांनी या आजीबाईच्या जिद्दी विषयी प्रशंसा केली आहे 

    दशक पूर्ती सोहळ्या निमित्त  भजनी मंडळ फांगणे, स्नेह परिवार मुंबई, आजीबाई शाळा फांगणे यांच्या वतीने भव्य मिरवणूक व दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. सुरूवातीला ज्यांच्या शुभहस्ते शाळेचा शुभारंभ झाला होता अशा मातोश्री इंदुमती मोतीराम दलाल यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. आजीबाई शाळेचा वाढदिवस कलिंगड कापून सालाबादप्रमाणे यंदाही साजरा करण्यात आला.यावेळी स्नेह परिवार सेनापती अशोक वायकूल, उद्योगपती रामकृष्ण कोलवणकर, प्रसिद्ध अभियंते तुकाराम जंगम, सरपंच वैभव सरोदे, सामाजिक कार्यकर्ते हेमंत देशमुख, उपस्थित होते.

अशोक वायकूल यांनी स्नेह परिवारातर्फे देदीप्यमान कामगिरी बजावणाऱ्या महिला भगिनींचा सत्कार करण्यात आला.आजीबाईना    गुडघेदुखी शामक पँड गुलाबी लुगडी, दप्तरे, पाट्या, पेन्सिल, खाऊ,औषधे अशा वस्तू  स्नेह परिवारातर्फे भेट देण्यात आल्या.या प्रसंगी विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले.शिक्षिका शितल मोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी  प्रकाश मोरे काळूराम केदार,योगेश तेलवणे, नितीन देशमुख, आकाश गायकवाड हभ.प.  नामदेव केदार,अशोक पांडुरंग केदार अंकुश केदार, संभाजी केदार,,नानू वाघ,जयराम केदार, पांडुरंग केदार, निखिल देशमुख, एकनाथ देशमुख, दत्तात्रेय देशमुख, भास्कर देशमुख, यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेंद्र बांगर यांनी केले आभार  गितेश देसले  यांनी मानले.



Post a Comment

0 Comments