Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसीच्या पाथर्ली शाळेत सौरऊर्जा यंत्रणेचा शुभारंभ

 

महापालिका आयुक्त डॉ इंदु राणी जाखड

यांच्याहस्ते करण्यात आले लोकार्पण

              ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

 गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लोकसहभागातून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली पूर्व येथील पाथर्ली शाळा क्रमांक 62 मध्ये सौरऊर्जा यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या कामाचा शुभारंभ महापालिका आयुक्त डॉ इंदु राणी जाखड यांच्याहस्ते आज करण्यात आला. पाथर्ली येथील शाळा क्रमांक 62 ही महापालिकेची कल्याण  डोंबिवलीतील पहिली सोलर शाळा म्हणून आता ओळखली जाणार असून महापालिकेच्या उर्वरित शाळांमध्ये देखील माहे मे पूर्वी लोकसहभागातून सौर ऊर्जा यंत्रणा  कार्यान्वित केली जाणार असल्याची असल्याची माहिती महापालिका आयुक्त आयुक्त डॉ इंदु राणी जाखड  यांनी दिली.


आयुक्त डॉ इंदु राणी जाखड यांनी महापालिका शाळांचा संपूर्णतः कायापालट करण्यास प्रारंभ केला असून महापालिकेच्या शाळांमध्ये देखील आता सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित केल्याने विजेची पूर्णपणे बचत होणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळी या सौरऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी अर्थसाहाय्य करणारे रीजन्सी निर्माण ग्रुपचे विकासक अनिल भतीजा, अत्यंत कमी वेळात ही यंत्रणा बसविणारे कॉस्मो इंटरप्राईजेस त्याचप्रमाणे यासाठी विशेष परिश्रम घेणारे महापालिकेचे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, उपअभियंता जितेंद्र शिंदे आणि पर्यवेक्षक संदीप गिरी यांचा महापालिका आयुक्त डॉ इंदु राणी जाखड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 यावेळी महापालिकेचे उपायुक्त संजय जाधव, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, महापालिकेचे स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अँबेसिडर डॉ प्रशांत पाटील, माजी पालिका सदस्य तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

 


Post a Comment

0 Comments