ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
भारताबाहेरील ऍप दैनदिन जीवनाचा भाग बनले आहे. मात्र या ॲपच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची माहिती संपूर्ण डाटा थेट जागतिक स्तरावर पोहोचतो. अतिशय महत्त्वपूर्ण माहितीचा हा संग्रह भारताबाहेर जाण्याचा ओघ रोखण्यासाठी आता डोंबिवलीकर तरुणांनी पुढाकार घेतला आहे. कपिल अगरवाल या तरुणाने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने ट्रिफी टेक्नोलॉजी नावाची कंपनी तयार करून या कंपनीच्या माध्यमातून इंस्टाग्राम आणि फेसबुक यासारख्या ऍप ला आव्हान देणारे i -ai नावाचे ऍप बाजारात आणले आहे. आज या तरुणाच्या भरारीचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
वेगवेगळ्या सोशल प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून जग जितके जवळ येत आहे तितकेच आपली वैयक्तिक माहिती जगाच्या कानाकोपऱ्यात अज्ञातांकडे पोहोचत आहे. देशातील हा महत्त्वाचा डाटा देशात सुरक्षित रहावा या उद्देशानेच डोंबिवलीकर तरुनाणी इंस्टाग्राम फेसबुक ला पर्यायी ॲप ची निर्मिती केली आहे. देशभरातील इंजिनियर्सना एका छत्राखाली आणून या तरुणांनी हे शिवधनुष्य पेलले असून, रिल्स व्हिडिओ शेअर करण्याच्या सुविधेबरोबरच व्हाट्सअप च्या चॅटिंगची सुविधा देखील यात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तर हॉटस्टार या एअर चॅनेल बरोबर देखील हे ॲप जोडलेले असल्याने वापरकर्त्याला एकाच ॲप द्वारे सोशल मीडियाशी जोडून राहता येणार आहे. अल्पावधीतच हे ॲप देशभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरल्याचे कपिल अगरवाल यांनी सांगितले. आज या तरुणांच्या डोंबिवलीतील कार्यालयाला आमदार रवींद्र चव्हाण यांनी भेट देत त्यांना शुभेच्छा दिल्या.
.jpg)


Post a Comment
0 Comments