जिल्हा परिषदेच्या पाच शाळांमध्ये देण्यात आले क्लासरूम लायब्ररीचे सेटअप
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
टीम परिवर्तन संस्था प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि क्रीडा उपक्रमांच्या माध्यमाने ग्रामीण भागातील वंचित घटकांच्या प्राथमिक समस्या सोडवण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमाने कसारा परिसरात दुर्गम खेड्यापाड्यात काम करणाऱ्या दि वात्सल्य फाउंडेशन संस्थेच्या मदतीने थराचापाडा, कोळीपाडा, ढेंगणमाळ, सुसरवाडी आणि तेलमपाडा या जिल्हा परिषदेच्या पाच शाळांमध्ये प्रथम संस्थेच्या लेट्स रिड या उपक्रम अंतर्गत क्लासरूम लायब्ररीचे सेटअप देण्यात आले.
ग्रामीण भागातील मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी त्याचबरोबर अवांतर वाचनातून त्यांची जिज्ञासा वाढावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे अविनाश पाटील यांनी सांगितले. नागरिकांकडे वाचुन झालेली पुस्तके या उपक्रमासाठी देण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष तुषार वारंग यांनी केले. या उपक्रमाचे व्यवस्थापन वात्सल्य फाउंडेशन संस्थेचे महेंद्र पाटील यांनी केले. यापुढेही ग्रामीण भागात शैक्षणिक उपक्रम चालु ठेवत गरजु विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा मिळवुन देण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहील असा निर्धार संस्थेच्या वतीने करण्यात आला.
.jpg)





Post a Comment
0 Comments