Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शिवजयंती उत्सवात महिला उद्योजकांना मदतीचा हात शिवसेना माजी नगरसेविका वृषाली जोशींचा पुढाकार

 

               ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर 

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीला शिवसेना माजी नगरसेविका वृषाली जोशी व माजी नगरसेवक रणजित जोशी यांनी डोंबिवली पश्चिमेकडील देवी चौक येथील जनसंपर्क कार्यालयासमोर

इंडो टेक युनाइटेड वे  सिडकोच्या सहकार्याने महिला उद्योजकांना  शिलाई  मशीन व कॅटरिंगचे सामान मोफत देऊन मदतीचा हात दिला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माजी नगरसेवक रणजीत जोशी व माजी नगरसेविका वृषाली जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी नगरसेविका जोशी म्हणाल्या,

 आपल्या प्रभागातील गरजू आणि होतकरू अशा व्यक्ती ज्याला खरंच काहीतरी करण्याची इच्छा आहे, अशा महिलांना आपण त्यांच्या उद्योगात  स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी  दोन शिलाई मशीन दिल्या. सोबत शिलाई मशीनसाठी लागणारे सर्व साहित्य अगदी कैची ते इस्त्री अशा अनेक वस्तू दिल्या. होतकर महिलांना  खानावळ सुरु करण्याची असेल त्या महिलांना शेगडी, मिक्सर, कुकर  आणि अशा त्या उद्योगाला लागण्यासाठी साहित्य आपण त्यांना उपलब्ध करून दिले आहे.वैशाली पेणकर, मनीषा शेडगे अनुश्री करंगुटकर, इंदुताई रणदिवे या महिलांना मदत करण्यात आली आहे. फाउंडेशनच्या रेश्मा खरात यांचे मी  धन्यवाद मानते. त्यांच्या मार्फत मला या उपक्रमाची माहिती मिळाली. युनायटेड वे मुंबई सिडको यांच्यामार्फत आपण या महिलांना सर्व साहित्य उपलब्ध करून दिले आहे. वनमंत्री गणेश नाईक  यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला होता,  त्यांचे देखील धन्यवाद मानते.  श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण श्री छत्रपती शिवाजी चौकात झाले.

Post a Comment

0 Comments