ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण परिमंडळ -3 मध्ये रिक्क्षा चोरीचे प्रकार घडल्याने अज्ञात चोरट्याचा शोधात होते. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या वाहन चोरी संदर्भातील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना योग्य ते मार्गदर्शन व सुचना दिलेल्या होत्या. 4 मार्च रोजी रिक्षा चोरीचा गुन्हा कोळसेवाडी पोलिसांनी दाखल केला होता. या गुन्हा प्रकरणी वाहन चोरीच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडे तपास करीत असताना डोंबिवली येथे राहणारा रेकॉर्डवरील आरोपी राजेंद्र जाधव हा १०० फुटी रोड कल्याण पुर्व येथे संशयीत रित्या फिरताना मिळुन आल्याने त्याला ताब्यात घेवुन पोलीस ठाण्यात आणुन त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्हयाची कबुली दिली.
रिक्षा चोरी करण्याऱ्या सराईत चोराला कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजेंद्र जाधव असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून रिक्षा चोरीच्या 4 गुन्ह्यांची उकल केली आहे

त्याच्याकडुन गुन्हयातील चोरी गेलेली रिक्षा क्रमांक MH 05 BG 9129 ही हस्तगत करण्यात आली. आरोपीला विश्वासात घेवुन अधिक तपास केला असता त्याने यापुर्वी कल्याण शहर हद्दीतून तीन रिक्षा चोरी केल्याचे कबुल केले व त्या रिक्षा कर्जत जिल्हा अहिल्या नगर येथे ठेवल्याचे सांगितले. त्याप्रमाणे कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे जावुन आणखी तीन रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी राजेंद्र जाधव यांने कोळसेवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रिक्षा चोरीचे 3 गुन्हे, तसेच बाजारपेठ हद्दीतून रिक्षा चोरीच्या एका गुन्ह्यांची उकल पोलिसांनी करीत 4 रिक्षा ताब्यात घेत सुमारे १ लाख ९० हजार रू किमतीचा मुदद्देमाल जप्त केला आहे.
हि कारवाई अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वपोनिरी. गणेश न्हायदे, पोलीस निरीक्षक साबाजी नाईक, सपोनिरी. दर्शन पाटील, संदिप भालेराव, पोहवा सचिन कदम, विशाल वाघ, भगवान सांगळे, गोरक्षनाथ घुगे, विकास भामरे, पोशि सुरेंद्र इंगळे यांनी केली आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments