ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पश्चिम क प्रभाग क्षेत्रातील मालमत्ता कराची रक्कम थकीत असलेल्या मालमत्तांना वारंवार नोटीस देवूनसुध्दा मालमत्ता कराचा भरणा करीत नसल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, परिमंडळ-1 चे उपआयुक्त प्रसाद बोरकर यांच्या समवेत क प्रभागाचे सहा.आयुक्त धनंजय थोरात व अधिक्षक बजरंग बजागे यांच्या पथकाने रक्कम रु. 5 लाख 82 हजार 42 इतक्या पोटी मालमत्ता सिल करण्याची धडक कारवाई नुकतीच केली.
यामध्ये कल्याण पश्चिम रामबाग येथील मालमत्ता क्र.C0100616300 रक्कम रु. 5 लाख 82 हजार 42 इतक्या थकबाकीपोटी पवन बार सील करण्यात आला. त्याचप्रमाणे कल्याण पश्चिम येथील राजा हॉटेल मालमत्ता क्र.C01000077700 यांची थकबाकीची रक्कम रु. 4 लाख 36 हजार 578 चेकद्वारे वसुल करण्यात आली.
.jpg)



Post a Comment
0 Comments