Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

ठाणे जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात क्रीडा व शारीरिक शिक्षण संघटना सक्रिय

ठाणे जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात  क्रीडा व शारीरिक शिक्षण संघटना सक्रिय

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ या शासनमान्य संघटनेच्या ठाणे जिल्हा शाखेची बैठक आप्पा शिंदे यांच्या कल्याण पश्चिमेच्या सभागृहात संपन्न झाली. ठाणे जिल्ह्यातील ठाणेकल्याण डोंबिवलीभिवंडी निजामपूरउल्हासनगरनवी मुंबई या महानगरपालिका तसेच सर्व तालुक्यांमधील बहुसंख्य शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. याप्रसंगी राज्याचे अध्यक्ष शरदचंद्र धारुरकरराज्याचे पदाधिकारी मिलींद क्षीरसागरराजेंद्र पितळिया यांची विशेष उपस्थिती होती.

शालेय क्रीडा स्पर्धेत तसेच एकविध संघटनांच्या जिल्हाविभाग व राज्य स्पर्धेत सहभागी झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक 10 वी व 12 वी च्या खेळाडूंना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने सवलतीचे अतिरिक्त गुण मिळतात. त्यासाठी क्रीडा शिक्षकांनी प्रत्येक खेळाडूंचा ऑनलाईन अर्ज भरण्याचा घाट क्रीडा विभागाने घातला आहे. क्रीडा शिक्षकांना ऑनलाईन अर्ज भरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत. महाराष्ट्रातील सर्व क्रीडा शिक्षकांच्या समस्या लक्षात घेऊन महासंघाचे राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर व इतर पदाधिकारी यांनी आयुक्तक्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच अध्यक्षमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ यांना भेटून त्रुटी दूर करण्याचे निवेदन दिले.  या सर्व त्रुटी दूर करण्यात महासंघाला यश मिळाले.

ऑनलाईन अर्ज भरताना दोन वेळा शुल्क भरणा करण्या बद्दलची दुरुस्ती करण्या विषयी पुढील वर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून बदल होतील असे मंडळाने खात्रीलायक आश्वासन दिले असल्याची माहिती शरदचंद्र धारुरकर यांनी उपस्थित क्रीडा शिक्षकांना दिली. राज्य संघटनेच्या संलग्नतेखाली ठाणे जिल्ह्याची कार्यकारिणी निवडताना धारुरकर यांनी सांगितले कीठाणे जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे कीजेथे 6 महानगरपालिका व 8 तालुके आहेत. त्यामुळे ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचा विस्तार करण्यासाठी प्रत्येक महानगरपालिकेतील व तालुक्यांमधील क्रीडा शिक्षकांना  जिल्हा संघटनेत प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे.

याअनुषंगाने ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.  ठाणे जिल्हा   व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे मध्यवर्ती कार्यालय ठाणे शहरात असेल असे धारुरकर यांनी घोषित केले. या सभेला महिला क्रीडा शिक्षिकांचा सहभाग लक्षणीय होता. ठाणे जिल्हा स्तरावर  महासंघाचे केवळ महिलांसाठी एक स्वतंत्र युनिट निर्माण करण्याचा सर्व उपस्थित महिलांनी निर्धार केला.


Post a Comment

0 Comments