ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर
बुद्धगया बिहार येथे सुरु असलेल्या "महाबोधी महाविहार ब्राह्मणवाद व पाखंडवाद यांच्या पासून मुक्त करा, ॲक्ट 1949 रद्द करा व सदर विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन गेल्या 12-2-2025 पासून सुरु आहे. सदर आंदोलनास सकल बौद्ध समाज डोंबिवली यांच्या वतीने पूज्यनिय भंते कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक डोंबिवली पूर्व येथे धरणे आंदोलन घेऊन समर्थन देण्यात आले. धरणे आंदोलनात सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली यांच्या मार्फत मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.सदर आंदोलनात बौद्ध समाज मोठया प्रमाणात उपस्थित होते.
.jpg)

Post a Comment
0 Comments