ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण शहराचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या नूतनीकरणाच्या कामाची शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांनी रविवारी पाहणी करत किल्ले दुर्गाडी चैत्र नवरात्रौत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला.
चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे किल्ले दुर्गाडी नवरात्रौत्सव समिती आणि शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून चैत्र नवरात्रौत्सव साजरा केला जातो. कल्याण पश्चिम मधील मानाचा ऐतिहासिक दुर्गाडी चैत्र नवरात्रौत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. याच पार्श्वभूमीवर दुर्गाडी उत्सव समितीचा अध्यक्ष या नात्याने शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील गड किल्ल्यावर सुरू असलेल्या नूतनीकरण कामाची पाहणी केली व संबंधितांना काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे सूचना दिल्या.

तसेच उत्सव काळात किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भात शिवसेना पदाधिकारी,सेवेकरी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. याप्रसंगी विभाग प्रमुख मनोहर व्यवहारे,उपविभाग प्रमुख रमेश पाटील,शाखा प्रमुख प्रशांत पाटील,चेतन म्हामुणकर, प्रतिक चौधरी, उपशाखा प्रमुख सुशिल कवटे, महिला उपशाखा संघटक वंदना जळवी, मनाली जाधव, अपर्णा बेलेकर, युवासेना भिवंडी लोकसभा विसतारक सूचेत डामरे, शहरप्रमुख सुजित रोकडे, दिनेश निकम, विधानसभा सोशल मिडीया प्रमुख चेतन कांबरे, युवती सेना स्वाती पाटील, उपविभाग प्रमुख चेतन बळरूगी आदी उपस्थित होते.
.jpg)

Post a Comment
0 Comments