ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
जागतिक महिला दिनानिमित्त साप्ताहिक ब्लॅक & व्हाईट आणि इंडियन TV न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात एकूण 32 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या व्यक्तीमत्त्वाबाबत आढावा घेऊन निवडक महिलांचा सदर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
ह्या पुरस्कार सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या पुरस्कारासाठी खाकी वर्दीतील रणरागिणींना निवडण्यात आले.ठाणे पोलिस उपायुक्त परिमंडळ 3 कल्याण विभागातील नऊ पोलिस ठाण्यातील उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना आयुक्त कार्यालयाच्या सहकार्याने ह्या पुरस्कारासाठी निवडण्यात आले.साधारण महिला दिनानिमित देशात अनेक शहरात ठीक ठिकाणी नावाजलेल्या महिलांचा सत्कार करण्यात येतो. परंतू आपल्या समाजातील महिला पोलिस ह्या व्यक्तिमत्वाकडे सहसा कोणाचेही लक्ष जात नाही.पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने अत्यंत कठीण समयी काम करीत असणाऱ्या महिला पोलिसांची कामगिरी तितकीच मोलाची असते.आपल्या कुटुंबापासून दूर दिवसभर,रात्रभर ड्युटी करीत असतात,नोकरीप्रती त्यांचा मानसिक,कौटुंबिक त्याग कोणाला सहज कळत नाही.ह्याच रणरागिणीच्या कर्तृत्वाची दखल ब्लॅक अँड व्हाईट साप्ताहिक,आणि इंडियन टीव्ही न्यूज चॅनेल यांच्या माध्यमातून घेतली गेली.आणि समाजातील estr कर्तृत्ववान महिलांच्या सोबत हा रणरागिणींचाही सन्मान करण्यात आली.प्रत्येक महिलेला तिच्या कर्तृत्वाबद्दल कौतुकाची थाप पडली तर तिचा हुरूप कैक पटीने वाढत असतो.आजची स्त्री कोणत्याही क्षेत्रात पुरुषांपेक्षा कमी नाही.हे वारंवार सिद्ध होत आहे.अशावेळी प्रसार माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.समाजातील प्रत्येक घटकाला समान न्यायाने जोखणे हे प्रसारमाध्यमांचे प्रथम कर्तव्य ठरते.
आणि त्याच भूमिकेतून साप्ताहिक ब्लॅक अँड व्हाईट आणि इंडियन टीव्ही न्यूज चॅनेल यांनी हा सत्कार सोहळा आयोजित केला होता.सदर सोहळ्याला महिलांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.प्रत्येक महिलेने आपल्याला मिळालेल्या सन्माना बद्दल आयोजकांचे आभार मानले.
"कौतुकाची थाप सतत पडत राहावी,आणि आपण पुढे पुढे चालत राहावं.सोबतीला माझी माणसं असावी, असं कायम वाटतं,त्यात अनेक आयुष्याचे अनेक टप्पे पार करतांना स्वामिनी सन्मान पुरस्कार मिळणे ही माझे भाग्यच समजते "
रेश्मा आरोटे जनसंपर्क अधिकारी जिल्हा परिषद ठाणे.
===============
"स्वामिनी सन्मान पुरस्काराने सन्मानित केले.माझ्या पाठीवर कौतुकाची थाप देत,पुढील कार्यास प्रोत्साहन दिले.महिलांना प्रोत्साहन देण्याचा आपला उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.आपण व आपल्या सर्व संपादक समूहाला मी हार्दिक धन्यवाद देते."
प्राध्यापिका,श्रद्धा साळी बदलापूर.
=================
"स्वामिनी सन्मान पुरस्कार सोहळा खूप सुंदर रित्या संपन्न झाला.आयोजक सर्व टीमचे अभिनंदन. विशेष म्हणजे सर्व क्षेत्रातील अशा प्रातिनिधिक स्वरूपात ३२ भगिनींचा सत्कार केला. खूप सुंदर सन्मानचिन्ह ,प्रत्येक महिला भगिनीचा स्मृतिचिन्हावर फोटो,मांगल्याचे प्रतिक तुळशी वृंदावन,मायेची प्रोत्साहनपर प्रेरणेची शाल,कार्याचा उल्लेख करणारा ब्लॅक अँड व्हाईट अंक आणि सर्वात महत्वाचे प्रेमळ मधुर असे आदरातिथ्य, नियोजनबध्द आखीव रेखीव कार्यक्रम,स्वागत ते अल्पोपहार , मानाचा फेटा.कुठेही गडबड ,गोंधळ नाही.शांतपणे विनम्र भावे एकमेकांचा आदर सन्मान करत एकमेकांशी संवाद कार्याची ओळख झाली.
स्वामिनी विशेषांक २०२५ सर्व पुरस्कारार्थी स्वामिनी रणरागिणीच्या कार्याचा विस्तृत आढावा अंकांत घेतलेला आहे. अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला. सूत्रसंचलनही अप्रतिम!माझाही पुरस्कार देवून सन्मानित केल्याबद्दल आपणा सर्वांची मी आभारी आहे.पुढे जाण्यास पुरस्कार प्रेरणा देतातच त्याचबरोबर जबाबदारी वाढली ह्याची जाणीवही करुन देतात.
सौ.ऋतुजा रविंद्र गवस मुख्याध्यापक सानपाडा
=============
.jpg)





































Post a Comment
0 Comments