ब्लॅक अँड व्हाईट पालघर प्रतिनिधी
सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील सफाळे पुर्व भागातील, मौज तांदूळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील वैतरणा नदी किनाऱ्यालगत असलेल्या नयनरम्य जागेत, असलेल्या नाईक फाउंडेशन ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी. सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर, येथील राष्ट्रीय सेवा योजना ( NSS ) चे विद्यार्थी कॅम्प साठी आलेले असताना. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांचे संकल्पनेतुन सुरू करण्यात आलेल्या. *जनसंवाद अभियान व सायबर गुन्हे मुक्त गाव मोहिमे अंतर्गत पोलीस ठाणे सफाळे यांच्या कडून आपल्या कार्यरत पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या मौजे. तांदुळवाडी, ग्रामपंचायत हद्दीतील नाईक फाउंडेशन येथील आलेल्या, NSS कॅम्प साठी आलेल्या, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर येथील विद्यार्थ्यां यांना, सायबर क्राईम, आर्थिक गुन्हयाचे प्रकार, अनधिकृत खोट्या कंपन्यांकडून देण्यात येणारी प्रलोभने व होणारी फसवणुक, ऑनलाईन नोकरी जाहिरात फसवणूक, OLX फसवणूक, लैंगिक फसवणूक, केवायसी फसवणूक, डिजिटल अरेस्ट, क्रेडिट कार्ड फसवणूक कशा प्रकारे होते तसेच त्यावरील उपाययोजना बाबत सफाळे पोलीस ठाणे प्रभारी पोलीस अधिकारी दत्ता शेळके सपोनि. यांनी सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच सायबर फ्रॉड झाल्यावर सायबर हेल्पलाईन नंबर 1930 वर संपर्क साधण्याच्या सुचना देत,सांगितले, जर आपणास सायबर गुन्हेगारी करणारे बद्दल अधिक माहिती पाहिजे असल्यास. पालघर पोलीस दलाच्या सुरू असलेल्या वेबसाईट बद्दल. पालघर पोलीस दलाचे फेसबुक पेज / इंस्टाग्राम पेज ला फॉलो करणे.असेही सांगितले.
केंद्र शासनाच्या मार्फत इंग्रज कालावधीतील भारतीय दंड संहिता कायदे बदलून. नवीन कायदे भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय सुरक्षा अधिनियम 2023, भारतीय साक्ष अधिनियम 2023 बद्दल अॕड. कांचन भोईर यांनी कडून NSS कॅम्पसाठी उपस्थितीत आलेल्या अंदाजे १५० विद्यार्थी यांना कायदे बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Post a Comment
0 Comments