'ठाणे जिल्ह्यात डि.वाय.फाऊंडेशनचे काम कौतुकास्पद' -आमदार किसन कथोरे
ब्लॅक अँड व्हाईट मुरबाड-प्रतिनिधी (दिलीप पवार)
संपूर्ण ठाणे जिल्ह्यासह मुरबाड तालुक्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये प्रचंड काम करणारी डी वाय फाउंडेशन संस्थेच्या वतीने मुरबाड तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पोलीस प्रशिक्षण देऊन व साहित्याचा वाटप करण्यात आले. त्याचबरोबर महिला सक्षमीकरण करण्यासाठी महिला सक्षमीकरणात संदर्भात मार्गदर्शन केले व त्यांना प्रमाणपत्र सुद्धा वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाला मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. भविष्यामध्ये मुरबाड तालुक्यातील तरुणांसाठी पोलीस भरती असेल कौशल्य विकास अंतर्गत विविध ट्रेनिंग असते यासाठी डी वाय फाउंडेशनचे विशेष कौतुक केले भविष्यात तरुणांना महिलांना जी काही मदत लागेल काही समस्या असेल तर संपर्क साधा महिला सक्षमीकरणासाठी विशेष भरीव काम करून महिलांनी एकत्र येऊन अशा प्रकारचे या ठिकाणी आश्वासन दिले.
तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा चारुशीला गायकर, मुरबाड तालुकाध्यक्ष रंजना शिंदे, मुरबाड तालुका डीवाय फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजी घागस, सल्लागार उमेश चौधरी यांनी विशेष मेहनत घेतली तर महिलांना हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी संपन्न झाला विद्यार्थ्यांना किट वाटले प्रमाणपत्र मोफत वाटले त्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मध्ये अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते भविष्यामध्ये डी वाय फाउंडेशन तळागाळामध्ये काम करेल अशा प्रकारचे आश्वासन सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांना दिले.
Post a Comment
0 Comments