शिवरायांना जन्माला घालणाऱ्या जिजाबाई घरोघरी निर्माण होणे महत्त्वाचे – माजी मंत्री कपिल पाटील
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
सध्याच्या काळात शिवरायांनी जन्म घेण्याची नितांत आवश्यकता असून त्यांना जन्माला घालणाऱ्या जिजाबाई घरोघरी निर्माण होणे महत्त्वाचे असल्याचे मत माजी केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले. आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवकालीन नाणे प्रदर्शनाचे उद्घाटन करण्या प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शेठ हिराचंद मुथा महाविद्यालय, शेठ हिराचंद मुथा सीबीएससी स्कूल तसेच मुथा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती कार्यक्रमाप्रसंगी ते उपस्थित होते.
कल्याण ही शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी असून महाराजांच्या शौर्य बुद्धिमत्ता याची महती नव्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे असे यावेळी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी सांगितले. या प्रसंगी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घटे, माजी आमदार प्रकाश भोईर, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे, भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश जगताप, मुथा महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश मुथा,ट्रस्टी मनीष मुथा, अविनाश मुथा आणि अन्वेषा मुथा, मुथा महाविद्यालय प्राचार्य अनुजा ब्रह्म, मुथा सीबीएससी स्कूल प्राचार्या सपना गादिया, सीबीएससी कॉलेज प्राचार्य दिपाली कांबळे, सामाजिक कार्यकर्ते विलास रंदवे, मदन शंकलेशा आदींसह इतर अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात यांचे विचार पुजले जातात ज्यांचे युद्ध धोरण, गनिमी कावा, प्रशासकीय कार्यक्षमता आजही सर्वांना प्रेरणा देतात अशा शिवछत्रपती महाराजांना मानवंदना देणे महत्त्वाचे असल्याचे मत आहे यावेळी मुथा महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश मुथा यांनी सांगितले. यावेळी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातर्फे सशस्त्र मानवंदना तसेच शिवगर्जना देण्यात आली. याप्रसंगी आयोजित शिवकालीन नाणे प्रदर्शन हे महत्त्वाचे आकर्षण ठरले.
Post a Comment
0 Comments