त्रुटी बाबत उद्योग मंत्र्यांशी चर्चा करण्याचे आमदार राजेश मोरे यांचे एम आयडीसीच्या अधिकाऱ्यांना आश्वासन
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील पाणी प्रश्नाबाबत आमदार राजेश मोरे यांनी डोंबिवली शहर सचिव आणि विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष चव्हाण, सतीश मोडक, निलेश शहा यांच्या समवेत एमआयडीसीच्या अधिकाऱ्याची भेट घेतली.
आमदार झाल्यापासून मागील दोन महिन्यात पाण्याबाबत आमदार मोरे यांनी घेतलेली ही चौथी बैठक आहे. दरम्यान या भागातील नागरिकांना पिण्यासाठी त्यांच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे त्याचबरोबर वाढत्या लोक्संख्येसाठी वाढीव कोटा मिळण्याबाबत ज्या ज्या त्रुटी असतील त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून तातडीने सोडविले जातील. मात्र अम्रृत योजनेच्या कामाचा वेग वाढवा, तसेच ग्रामीण भागासाठी मंजूर असलेल्या कोट्यातून सर्व पाण्या त्या भागासाठी सोडण्याचे नियोजन करा यासारख्या सूचना आमदार मोरे यांनी एम आयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. अधिकार्यांनी ग्रामीण भागातील पाण्याच्या नियोजनाचा भविष्यातील प्लान सादर केला. यावेळी कार्यकारी अभियंता दिलीप आव्हाड महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात पाणी प्रश्न भेडसावत असून या नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी एमआयडीसी अधिकार्याशी चर्चा करण्या बरोबरच पहिल्या नागपूर अधिवेशनात देखील आमदार मोरे यांनी या भागासाठी वाढीव पाणी कोटा मंजूर करून देण्याची मागणी केली आहे. आज पुन्हा एम आयडीसी अधिकार्याची भेट घेत त्यांनी या भागाचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी एमआयडीसीने केलेल्या नियोजन आराखड्याची आमदार मोरे यांनी पाहणी केली. यानंतर या नियोजनाच्या अमलबजावणीत येणाऱ्या त्रुटी दूर करण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन देतानाच नागरिकांना पिण्यासाठी मुबलक पाणी लवकरात लवकर लवकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
तर याबाबत आजच मंत्री सामंत यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान नागरिकाना पाणी मिळणे हा त्यांचा मुलभूत अधिकार असल्याने हा प्रश्न सातत्याने पाठपुरावा करून मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments