Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

12 फेब्रुवारी रोजी मलंगगडावर पालखी सोहळ्याचे आयोजन

 

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण मधील दुर्गाडी किल्ल्याचा लढा जिंकल्यावर आता श्री मलंगगड लढा हि जिंकणार  असा विश्वास शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी व्यक्त केला आहे.  

प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षी देखील श्री मलंगगड पालखी सोहळा 12फेब्रुवारी पासून सुरु होत असून याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गोपाळ लांडगे बोलत होते.  यावेळी शिवसेना उपनेत्या विजया पोटे, महिला जिल्हा प्रमुख लता पाटीलशहरप्रमुख रवी पाटीलमाजी नगरसेवक प्रशांत काळे, मयूर पाटीलजयवंत भोईर, माधुरी काळे, रामदास कारभारीविजय देशेकरदिलीप गायकवाड यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.

  त्यानिमित्ताने माहिती देताना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले की  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार 1978 पासून श्री मलंगगड लढा सुरु आहे.  त्या नंतर धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु ठेवलेला  हा लढा आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.  श्री मलंगगड लढ्याबाबत न्यायालयात दावे सुरु आहेतयाला  नक्कीच यश येईल ज्या प्रमाणे कल्याण दुर्गाडी किल्ला लढा  विजयी झालो त्या प्रमाणे श्री मलंगगड लढा हि जिंकणार असा विश्वास गोपाळ लांडगे यांनी व्यक्त केला. प्रतिवर्षी प्रमाणे यानडा देखील शिवसैनिक मोठ्या संख्येने श्री मलंगगडावर श्री मलंगबाबांच्या दर्शनासाठी जातील. दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते मलंगबाबांच्या समाधीस आरती होईल. श्री.मलंगगड यात्रेबाबत  माहिती देतांना दिनेश देशमुख यांनी सांगितले की 12 फेब्रुवारी पासून पाळखी सोहळयाला सुरुवात होणार आहे.  यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  नवनाथ सांप्रदायातील मच्छिंद्रनाथ यांचे स्थान आहेतसे पुरावे हि आहेत.  तसेच श्री पिर हाजीमलंग साहेब दर्गा ट्रस्ट नावे नोंदवले आहे ते चुकीचे आहे.  याबाबत अ प्रमाणपत्र मिळावा म्हणून न्यायालयात दावा सुरु आहे. हिंदुंचे अनेक पुरावे आहेत.  तसेच वर्षभर विविध कार्यक्रम सुरू असतात. रामनवमी, गुरूपौणिमा,रंक्षाबंधन, ललित पंचमी, दहिहंडीदिवाळी पाडवा, प्रत्येक महिन्यात येणाऱ्या  पौर्णिमेला कार्यक्रम करण्यात येतात अशी माहिती दिनेश देशमुख यांनी दिली.

 


Post a Comment

0 Comments