ब्लॅक अँड व्हाईट दिवा ( प्रतिनिधी )
ठाणे - दिवा दातिवली येथील विद्या दर्पण एज्युकेशन सोसायटीचे सिम्बॉयसिस कॉन्व्हेंट शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक १३/२/२५ रोजी आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी सर्व शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कु. साक्षी रमाकांत मढवी (रमाकांत मडवी फाउंडेशन अध्यक्षा) व समीर बाळा पाटील (उपाध्यक्ष श्री साई सेवक मंडळ दिवा) शाळेच्या चेअरमन श्रीमती उषाराणी देव, शाळेचे संस्थापक श्री कमलराज देव, शाळेच्या प्राचार्य स्नेहलता देव आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेच्या प्राचार्य स्नेहलता देव शाळेच्या कार्यालय अधीक्षक श्रीमती प्राजक्ता मेहेर यांच्या नेतृत्वाखाली तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मधुश्रीता परिदा यांच्या मार्गदर्शनानुसार शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग कसा राहील यासाठी अथक प्रयत्न केला. सूत्रसंचालन शाळेच्या पर्यवेक्षिका सौ श्रावणी साजेकर आणी वरिष्ठ शिक्षिका सौ मधुश्रूता गोविंद यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तमरीत्या सादरीकरण केले. या स्नेहसंमेलनामध्ये जवळ जवळ ४५० विद्यार्थ्यांचा सहभाग होता प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट असे समाज प्रबोधनात्मक ' किर्तन ',' नाटक ', ' गीत सादरीकरण '
' भाषण ', तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती दर्शविणारे शिवराज्याभिषेक सोहळा तसेच अनेक कला संस्कृतीचे अतिशय अद्भुत प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला उपस्थित पालकांनी भरभरून दाद दिली.
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले तसेच सर्व शिक्षक वर्गाला देखील पुरस्कृत करण्यात आले. खरेच हे वार्षिक संमेलन केवल नाट्य नृत्य यांचा आविष्कार न राहता विचारांचे संमेलन मध्ये हे संमेलन अंतर्मुख करणारे होते. असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे आपल्या भाषणातून केले. अतिशय धडाक्यात साजरी झालेल्या या संमेलनाचे आभार प्रदर्शन शाळेचे डेप्युटी श्री विनोद गुरव यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Post a Comment
0 Comments