ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वृत्तसेवा
सोसायटी फॉर ट्रान्सफॉर्मेशन, इन्क्लुजन अँड रिकग्निशन थ्रू स्पोर्ट्स (स्टेअर्स) ही तळागाळातील क्रीडा आणि युवकांच्या विकासात आघाडीवर असलेली राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन संस्था आहे.याच संस्थेच्या माध्यमातून
स्टेअर्स महाराष्ट्र राज्य युवा किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 स्पर्धा 16 फेब्रुवारी 2025 रोजी व्हीनस - BMC शाळा कलेक्टर कॉलनी, चेंबूर येथे आयोजित करण्यात आली होती.सदर स्पर्धेत प्रज्ञा इंग्लिश स्कूलने 16 फेब्रुवारी 2025 रोजी चेंबूर मुंबई येथे आयोजित ह्या युथ किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 जिंकून शाळेचे आणि संस्थेचे नाव उंचावले आहे.
सदर शाळेच्या हुशार विद्यार्थ्यांनी अपवादात्मक कौशल्य, शिस्त आणि दृढनिश्चय, सुरक्षितता दाखवली,आणि यशाला गवसणी घातली.यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे..
1.साहिन खानने किकबॉक्सिंगमध्ये (12 वर्षांखालील 51 किलो वजनी गट) प्रभावी नॉकआउटसह *सुवर्णपदक* मिळवले.
2.परवीज चौधरीने किकबॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले (12 वर्षाखालील वयोगट 36 किलो वजन श्रेणी), अचूकता आणि फॉर्मसह न्यायाधीशांना प्रभावित केले.
3.सैफ खानने किकबॉक्सिंगमध्ये (१० वर्षाखालील - ४१ किलो वजन श्रेणी) प्रत्येक फेरीत लवचिकता आणि धोरण दाखवत कांस्यपदक मिळवले.
4.सुलतान काझीने संगीत प्रकारात सुवर्णपदक जिंकले (14 वयोगटाखालील 58 किलो वजनी गट)
प्रज्ञा इंग्लिश स्कूलच्या विश्वस्त डॉ पद्मिनी कृष्णा मॅडम आणि जरीन बैग मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नेहा ढगे आणि प्रशिक्षक शैलेश देठे यांनी त्यांच्या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आणि पुढील काळात असेच यश संपादन करावे अशा शुभेच्छा दिल्या.
"हा विजय विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि समर्पणाचा दाखला आहे. आम्ही त्यांचे यश साजरे करतो आणि भविष्यात आणखी अनेक यशांची अपेक्षा करतो"
--- असे विश्वस्त पद्मिनी कृष्णा मॅडम यांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments