Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मां साहेब जिजाऊंचे संस्कार आणि छत्रपतींचा आदर्श आम्ही विसरलो - शिवव्याख्याते अमर राऊत

                     ब्लॅक अँड व्हाईट मुरबाड-प्रतिनिधी 

अखंड हिंदूस्थानची राष्ट्रमाता स्वराज्य जननी मां साहेब जिजाऊंनी दिलेल्या संस्कारामुळे छत्रपती शिवराय घडले आणि हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली तर छत्रपतींचा आदर्श आम्ही विसरलो म्हणून आपली आज वाताहात झाली आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवव्याख्याते अमर राऊत यांनी मुरबाड येथे केले. 

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेशजी सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड शहराध्यक्ष अतुल तेलवणे यांनी मुरबाड शहरातील बागेश्वरी चौक येथे शिव व्याख्यानाचे आयोजन केले होते.यावेळी अमर राऊत  पुढे बोलताना म्हणाले जिजाऊने एक आदर्श पुत्र, आदर्श लोककल्याणकारी राजा निर्माण केला. शिवरायांचा आदर्श, त्यांचे संस्कार, त्याग, पराक्रम, शौर्य आपण फक्त वाचतो पण आचरणात आणत नाहीत हेच आपले मोठे दुर्दैव आहे.शिवाजी जन्माला यावा पण तो दुसर्याच्या घरात ही मानसिकता बदला.शिवरायांना मानतो, पुजतो, वाचतो, रेखाटतो,जयंती साजरी करतो पण त्यांचे विचार, दुरदृष्टी आत्मसात करत नाही ही काळाची गरज आहे असे परखड  विचार यावेळी उपस्थित शिवप्रेमी समोर आपल्या पहाडी शैलीत मांडले.

या कार्यक्रमासाठी मुरबाड शहरातील दानशूर व्यक्तीमत्व महेबुबभाई पैठणकर, भाजपा शहराध्यक्ष सुधिर तेलवणे, रिपाई तालुका अध्यक्ष दिनेश उघडे, माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक मोहनशेठ सासे, कृष्णकांत मलिक, पत्रकार दिलीप पवार, चेतन पोतदार, रूपेश गुजरे,जिजाऊ संघटनेचे सज्जन जमदरे,  सौ.अश्विनी बोंबले, सागर कार्ले, जगदिश पष्टे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी, महिला व नागरिक उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैभव मसणे यांनी केले. यावेळी जिजाऊ संघटनेच्या वतीने आरोग्य सेवेत मोलाचे योगदान दिलेल्या ताराबाई घायवट यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष  पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Post a Comment

0 Comments