श्वानावर चुकीच्या पध्दतीने उपचार करीत असल्याने श्वानांचा बळी जात असल्याचा केला आरोप
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या केंद्रात श्वानांवरती चुकीच्या पद्धतीने उपचार केले जातात. त्यामुळे त्यांना अनेक व्याधींनी पछाडले जातात. यांत अनेक श्वानांचा आतापर्यंत बळी गेला आहे. यामुळे संतापलेल्या प्राणी मित्र हिर राजपूत हिने गुरुवारी दुपारी पालिका मुख्यालयात जखमी श्वानासह पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठाण मांडले. या जखमी श्वानांना वाचवण्यासाठी पालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी तिने आक्रोश केला. या ठिय्या आंदोलनामुळे प्रशासकीय आधिकारी , सुरक्षारक्षक विभाग सह पोलीस यंत्रणेला घटनास्थळी धाव घ्यावी लागली.
केडीएमसी प्रशासन आरोग्य विभागाच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आश्विनी शुक्ला, उप आयुक्त प्रसाद बोरकर, संजय जाधव यांनी प्राणी मित्र कल्याणात राहिवाशी हिर राजपूत यांची श्वानां संदर्भीत कैफियत ऐकून घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु आयुक्तांशी भेट घेऊन आतापर्यंत आपण केलेला पत्रव्यवहारा संदर्भात प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांना सांगून ठोस आश्वासन घेतल्याशिवाय ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही असा पावित्रा घेतला. तासाभराच्या या घाडामोडी अंती बाजार पेठ घटनास्थळी पोहचले त्यांनी देखील तिचे म्हणणे ऐकून घेत समजविण्याचा प्रयत्न केला.
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पशुवैद्यकीय आधिकारी यांनी तिथे येऊन सांगितले की, भटक्या बेवारस कुत्र्यांचे निबिर्जीकरणाचे काम एपीएमसी मार्केट शेजारील श्वान निबिर्जीकरण केंन्द्रात योग्य ती देखभाल करीत केले जाते. व्याधीग्रस्त श्वानावर खाजगी रूग्णालयात उपचार करू शकता अशी माहीती दिली. अखेर प्राणी मित्र युवतीची समजूत काढण्यात प्रशासनाला यश आले.
Post a Comment
0 Comments