Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण डोंबिवली महानगरपालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्थेच्या वतीने संविधान साहित्य संम्मेलन संपन्न

 

राज्यघटनेला कमजोर करण्याचे प्रयत्न होतात तेव्हा तेवढ्याच ताकतीने राज्यघटना जास्त जोराने स्पष्टपणे पुढे येते - डॉ.सुरेश माने ज्येष्ठ संविधान तज्ञ


कल्याण डोंबिवली महानगरपालिका

बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्थेच्या

वतीने संविधान साहित्य संम्मेलन संपन्न


              ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका व कल्याण डोंबिवली महानगरपालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने संविधान साहित्य संम्मेलनाचे आयोजन आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण या ठिकाणी करण्यात आले होते.

सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण पश्चिम येथून संविधान रॅलीची मिरवणूक सुरू होऊन आचार्य अत्रे साहित्य नगरी रंगमंदिर कल्याण पश्चिम येथे सांगता करण्यात आली.  या साहित्य संमेलन उद्घाटन सत्रात विचार मंचकावर उपस्थित महापालिका आयुक्त इंदू राणी जाखड सम्मेलन अध्यक्ष ज्येष्ठ संविधान तज्ञ डॉ. अॅड. सुरेश मानेअतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, उपआयुक्त प्रसाद बोरकर रमेश मिसाळसंजय जाधवमाजी महापौर रमेश जाधवपालिका सचिव किशोर शेळके, संस्था अध्यक्ष तथा संयोजक चंद्रकांत पोळ, कल्पना खरात इत्यादी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ संविधान तज्ञ डॉ. अॅड. सुरेश माने यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले कीराज्यघटनेला जेव्हा जेव्हा कमजोर करण्याचे प्रयत्न होतात तेव्हा तेवढ्याच ताकतीने राज्यघटना जास्त जोराने स्पष्टपणे पुढे येते.  हा गेल्या ७५वर्षाचा आढावा लक्षात घेता कुणाच्या पोटामध्ये गोळा येण्याची अजिबात गरज नाही. गेल्या ७३ पासून ७६ पर्यंतच्या कालखंडामध्ये देशाभरात अनेक घटना घडल्या काही चांगल्या घडल्या काही वाईट घडल्या. पल्याला एक नवीन राज्यघटना दिली याला आज ७५वर्ष पूर्ण झाली. खूप सकारात्मक दृष्टिकोनातून बांधणी झाली रचना झाली. अशा विविध पैलू वरती भाष्य करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

कवि संम्मेलन प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांच्या अध्यक्षतेने झाले तर सूत्रसंचालन डॉ. सिद्धार्थ मोरे यांनी केले यात अनेक कवींनी आपला सहभाग नोंदवला होता. मानवाच्या कल्याणाचा जाहीरनामा संविधान या परिसंवादाचे अध्यक्ष साहित्यिक डॉ.मिलिंद कसबे होते.  या कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवरांचा सन्मान सोहळा करून काही सामाजिक कार्यकर्ते यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.


Post a Comment

0 Comments