ब्लॅक अँड व्हाईट मुरबाड-प्रतिनिधी(दिलीप पवार)
मुरबाड शहरातील बाजार समितीच्या प्रांगणात 13 फेब्रुवारी पासून सुरु झालेल्या अध्यात्मिक परंपरेचा मानदंड असलेला धर्म महोत्सव म्हणजेच ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली असून या वर्षी अनेक नावाजलेले व प्रज्ञावंत समाजप्रबोधकारांचे किर्तन व प्रवचन श्रवणाचा लाभ भाविकांना मिळत आहे.सुरुवाती पासूनच यावर्षी हजारो श्रोत्यांची उपस्थिती श्रवणाला पाहायला मिळत आहे.बिडचे भाषाप्रभू अमृतस्वामी महाराजांनी आपल्या अमृत वाणीने उपस्थित श्रोत्यांना मंत्र मुग्ध करत वारकरी संप्रदायाचे सध्या होत असलेले बाजारीकरणावर आपल्या खास शैलीत समाचार घेतला.तर ज्ञानेश्वर महाराज काकडे यांनी ज्ञानोबा , तुकोबा, एकनाथ,नामदेवा सारख्या महान संताचे महाराष्ट्रावर मोठे उपकार आहेत याचे स्मरण करून दिले.
या सप्ताहाला भाविकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. किर्तनाला तालुक्यातील प्रसिद्ध मृदंग वादक सुधीर कराळे व नितीन चौधरी यांच्या सुरेख वादनाची व गायकांची साथ लाभत आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह चालतो ते महंत प्रमोद महाराज जगताप यांनी मुरबाड करांचे कौतुक केले असून या धर्म महोत्सवाच्या कार्यात प्रत्येकाचा हातभार लागला पाहिजे असे आवाहन करताना यावर्षी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींची जयंती 19 फेब्रुवारीला म्हणजे पालखी मिरवणूक सोहळ्याच्या दिवशी येत असल्याने सदर मिरवणूक सोहळा त्याच दिवशी सकाळी 10 वा. आयोजित करण्यात आला असून 20 तारखेला काळा होणार असल्याचे सांगत सर्वांना कळविण्याचे आवाहन केले आहे.या सप्ताहासाठी लक्ष्मण सरनिंगे, शांताराम (आण्णा) बांगर व त्यांचे सर्व सहकारी विशेष मेहनत घेत आहेत.
Post a Comment
0 Comments