ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
एसटी ही सामान्य माणसाची जीवनवाहिनी आहे. ही भाडेवाढ म्हणजे सामान्य माणसांना कोलमडून टाकणारी असून आज गप्प बसलो, तर ही लूट थांबणार नाही असे सांगत कल्याणमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठलवाडी बस डेपो येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
राज्यात एसटीच्या भाड्यात दरवाढ केल्याने याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून या दरवाढीचा निषेध करण्यसाठी विठ्ठलवाडी बसडेपोच्या गेटवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत चक्काजाम केला. बस डेपो मधून बाहेर पडणारी बस रोखून धरत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी
कोळसवाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आंदोलकांना ताब्यात घेतले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Post a Comment
0 Comments