Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

गांजा विकणा-या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

 

 लाख ९७ हजार ७८० रुपये किंमतीचा

 २९ किलो ९५५ ग्रॅम गांजा जप्त


तीन जणांना केली अटक

कल्याण कल्याण पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे यांनी परिमंडळ ३ कल्याण स्तरावर अवैध धंदयावर कारवाई करणेकरिता विशेष पोलीस पथक स्थापन केले असून या पथकाने गांजा अंमली पदार्थ विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. डोंबिवली पोलीस स्टेशन व पोलीस उप आयुक्तपरिमंडळ ३कल्याण पथकाने दोन दिवसांत संयुक्तपणे केलेल्या कारवाई दरम्यान एकुण ५ लाख ९७ हजार ७८० रुपये किंमतीचा २९ किलो ९५५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असुन एकुण ३ आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.


विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण व पोलीस पथक मंगळवारी गस्त करीत असताना दुपारी १२:१५ वा. आयरेगांवडोंबिवली पुर्व येथे एक इसम संशयास्पदरित्या लपण्याचा प्रयत्न करित असतानात्यांस पळुन जाताना पकडले. या इसमाच्या ताब्यातील प्लास्टीकच्या पिशवीची झडती घेतली असतात्यामध्ये ७ किलो ६६ गॅम वजनाचा १ लाख ४० हजार रुपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आला. डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या या आरोपीचे नांव किरण शहावय ४२ वर्षेत्याच्या विरुद्ध डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत त्याला गुन्हयात अटक करण्यात आले आहे. हा गांजा त्याने कोठुन व कोणाकडुन आणला आहेतसेच तो येथे कुणाला विक्री करणार आहेयाबाबत अधिक तपास सुरू असून या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक गोरखनाथ गाडेकर हे करित आहेत.

तसेच आज विशेष पथकातील पोलीस उप निरीक्षक प्रसाद चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने चोळेगांव तलावडोंबिवली पुर्व येथे सापळा लावुन थांबलेले असतांनादुपारी एक वाजण्याच्या सुमारास येथे मध्य प्रदेश येथील सचिन मोरे (२१) व संजु लुहार (२४) हे दोन इसम आलेत्यांना थांबवुनत्यांच्या बॅगेची झडती घेतली असताया दोघांच्या बॅगेमध्ये २२ किलो८८९ गॅम वजनाचा ४ लाख ५७ हजार ७८० रुपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आला. या दोन्ही आरोपींविरुद्ध डोंबिवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक अच्युत मुपडे हे करित आहेत.


Post a Comment

0 Comments