ब्लॅक अँड व्हाईट (मुरबाड) दिलीप पवार
शेतकऱ्यांना आज अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे त्यांनी काबाडकष्टाने पिकवलेला शेतमाल कधी कवडीमोल भावाने विकावा लागतो तर कधी निसर्ग कोपतो मुरबाड तालुका हा कृषी प्रधान तालुका आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाताला सध्या शासन 2300 रुपये हमीभाव देऊन खरेदी करत आहे तो तोकडा असून 3500 ते 4000 हमीभाव देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी माळ आदिवासी खरेदी केंद्राच्या खापरी येथे धान खरेदी केंद्राच्या उद्घाटनावेळी केले.
आमदार किसन कथोरेंच्या पुढाकाराने आदिवासी सेवा सोसायटी माळ यांच्या वतीने हे भात खरेदी केंद्र सुरु झाले असून यावर्षी कारभार सुधारा पुढील वर्षी लवकरच केंद्र सुरु होईल अशी सूचना या वेळी आमदार कथोरे यांनी चेअरमन, सचिव व संचालक मंडळाला केली. तसेच शासनाकडे असलेले कमिशनचे 54 लाख रुपये लवकरच मिळवून देण्यासाठी संबधितांशी चर्चा करणार असल्याची ग्वाही दिली तर उपस्थित शेतकऱ्यांना सौर ऊर्जा सारख्या योजना राबवून आपली आर्थिक बचतीचे आवाहन केले.तर संजय शेळवले या शेतकऱ्याला प्रथम नंबरचे टोकन व पावती आमदारांच्या हस्ते देण्यात आली.
या भात खरेदी केंद्राच्या उद्घाटनासाठी उल्हास बांगर,सुहास मोरे, दिपक पवार,अनिल घरत, सिमा घरत,अशोक मोरे, हरिभाऊ राऊत, संजय पवार, राहूल पवार, माजी आमदार तेलम, सेवा सोसायटीचे चेअरमन गणपत मेंगाळ, सचिव मधुकर कवटे, भुपेंद्र मोरे, श्याम राऊत, आबा देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल घरत यांनी केले तर सुत्रसंचालन श्री गोडांबे यांनी केले.
Post a Comment
0 Comments