Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

"सडक सुरक्षा जीवन सुरक्षा” यांवर विद्यार्थ्याना मार्गदर्शन

 

सडक सुरक्षा जीवन सुरक्षा” यांवर विद्यार्थ्याना मार्गदर्शन

एक चांगला मदतकर्ता व्यक्ती व जवाबदार नागरिक कसे बनावे ?


                ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 


मानवी जीवन अमूल्य आहे त्या जिवाला जपले पाहिजेल म्हणूनच श्री तिसाई मोटार ड्रायव्हिंग स्कूल आणि उप प्रदेशिक परिवहन कार्यालयकल्याण यांनी मिळून मॉडेल कॉलेज  मध्ये "सडक सुरक्षा जीवन सुरक्षा” या कार्यक्रमाचे औचित्य साधाले होते.

भारतात वाढत्या लोक संख्ये मुळे लोकांच्या गरजा देखील वाढत चालल्या आहेत.त्यातील एक महत्वाची गरज म्हणजेच वाहन होय. वाहन चालक वाहतूक करत असताना नियमांचा पालन करत नाही. त्यामुळे बऱ्याचदा वाहन चालकचा अपघात होतो. त्यामुळे मोटार वाहन निरीक्षक अनिल धात्रक यांनी विद्यार्थ्यांना वाहनांचा अपघात कसा टाळावा याची थोडक्यात माहिती दिली होती.

बरेचदा आपण वाहन चालवत असताना रस्त्या वरिल बंधनकारक चिन्हेसावधान करणारी चिन्हे व माहिती देणारी चिन्हाण कडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे “नियम पाळा अपघात टाळा” असे घोष वाक्य सांगितले. त्याच प्रमाणे सेफ्टी वेल्फेअर असोशिएशनचे संस्थापक विशाल शेटे यांनी देखील विद्यार्थ्याना अपघात ग्रस्त व्यक्तीची मदत कशी करावी व राष्ट्रीय महामार्गावरील हेल्पलाईन क्रमांकाचे (१०३३) महत्व समजावून सांगितले. 


या कार्यक्रम प्रसांगी उपस्तित श्री तिसाई मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक निलेश गायकवाडमॉडेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेश ध्रुवांशीमोटार वाहन निरिक्ष अनिल धात्रककार्यक्रम अधिकारी रवी शेडगे व मनिष कणखारे, उपकार्यक्रम अधिकारी सुदाम मोखाल व अजय ब्राह्मणे आणि आर एस पी शिक्षक सुभाष गायकवाड इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments