Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

चित्रकार जय सालीयन यांच्या चित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

                ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वार्ताहर 

 नेहरू सेंटर आर्ट गॅलरी , वरळी, मुंबई येथील दिनांक 24 ते 30 डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजित समूह चित्र प्रदर्शनात मुंबईचे चित्रकार जय सालीयन यांनी काढलेली व्यक्तिचित्रे खूप गाजली. त्यांनी आतापर्यंत राजकीय पुढारी,गायक, चित्रपटसृष्टीतील कलावंत यांची  अनेक व्यक्तिचित्रे आता पर्यंत  काढली आहेत. पण या प्रदर्शनात प्रदर्शित आधुनिक शैलीत अप आधारित त्यांची स्वतःची दोन सेल्फ पोर्ट्रेट , तसेच एक व्यक्तीचित्र  आणि  लाईफ साईज चार ललना चित्रे खूप गाजली आणि एक विकले गेले. त्यांनी  कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक माध्यमातून रंगविलेलि ही चित्रे पाहण्यासाठी चित्र रसिकांनी  अलोट गर्दी केली आणि त्यांच्यावर कौतुक सुमनानची उधळण केली . 

चित्रकार जय यांनी कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक माध्यमाचा वापर करून या चित्रांतून व्यक्ती, स्थान यांसोबतच अलंकरण, रंगीत पेहराव यांचाही त्यांचा विशेष अभ्यास त्यांनी दाखविला. त्यामुळे ही त्यांची व्यक्तिचित्र विशेष उठावदार झाली. ,तसेच सोबत वरील असणार्‍या स्त्री चित्रात याचा प्रत्यय येतो. त्यांनी आपल्या विशिष्ट रंगलेपण आणि तिरप्या रेषांच्यासाहाय्याने सहज पण मनमोहक फटकाऱ्यांनी काढलेली ही चित्रे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांची रेखाचित्रे अनेक पुस्तकांत प्रसिद्धआहेत. 

तसेच अनेक रेखाचित्रे त्यांच्या संग्रही  ही आहेत. अशी विविध प्रकारची व्यक्तिचित्रे चित्रकार जय सालीयन यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना आणि शैलीचि साक्ष देतात ,असे चित्रकार जय सालीयन यांच्या विषयी कौतुक उद्गार प्रसिद्ध चित्रकार आणि क्युरेटर ज्यांनी चाळीसहून अधिक विविध बाल आणि तरुण  चित्रकारांची चित्र प्रदर्शने आयोजित केले आहेत असे प्राचार्य श्री .अरविंद पुरुषोत्तम सावंत यांनी काढले. सोबत  निळ्या साडीतील उभ्या ललना चित्रास त्यांना एस.पी. मेमोरियल ट्रस्ट, मुंबई पुरस्कृत थोर चित्रकार डॉ. एस.एम. पंडित यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केलेला पुरस्कार देण्यात आला. यासाठी  या मेहनती ,गुणी चित्रकाराचे सर्व स्तरांतून खूप खूप अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments