ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
आज दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी *पोलीस रेजिंग डे* निमित्ताने डॉ.अमरनाथ वाघमोडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकपाडा पोलीस स्टेशन, यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी 12:00ते 12:30 वाजेच्या दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्राथमिक शाळा, उंबर्डे कल्याण प शाळेचे विद्यार्थी यांचा पोलीस स्टेशन भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .सदर वेळी त्यांना पोलीस स्टेशन येथे चालणारे कामकाजाबाबत माहिती देऊन त्यांना पोलीस स्टेशन मधील हत्यारे बाबत माहिती दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले.
त्याच प्रमाणे दुपारी 12:30ते 13:15 वाजेच्या दरम्यान सेंट लॉरेन्स स्कूल,उंबर्डे रोड, कल्याण प येथे *सायबर जनजागृती तसेच गुड टच , बॅड टच* याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधून जनजागृती करण्यात आली.
सदर वेळी *सायबर तज्ञ ॲडव्होकेट संग्राम घुगे* यांनी सायबर जनजागृती विषयक मार्गदर्शन केले तसेच पोलीस उपनिरीक्षक विजय भालेराव यांनी गुड टच , बॅड टच तसेच सोशल मीडियाचा वापर आणि विना परवाना ड्रायव्हिंग याविषयी मार्गदर्शन केले. सदर वेळी सुमारे 200 विद्यार्थी व 15 शिक्षक तसेच शाळेच्या प्रिंसीपल उपस्थित होते.
.jpg)



Post a Comment
0 Comments