ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), कल्याण येथे रस्ता सुरक्षा अभियान २०२५ चे उद्घाटन उत्साहात पार पडले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेश कल्लूकर यांनी भूषवले.
रस्ता अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अपघातग्रस्तांना दोन मिनिटे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मोटार वाहन निरीक्षक अनिल धात्रक यांनी प्रास्ताविक भाषण केले आणि नागरिकांना रस्ता सुरक्षा अभियानात सहभागी होण्यासाठी आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्लूकर यांनी कल्याण उप प्रादेशिक परिवहन अंतर्गत होणाऱ्या अपघातांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी अपघात होण्याची कारणे आणि त्यावर योग्य उपाययोजना काय आहेत, यावर चर्चा केली.सदर रस्ता सुरक्षा अभियान २०२५ च्या माध्यमातून जनजागृती करत, अपघातमुक्त रस्ते आणि सुरक्षित प्रवासासाठी प्रयत्नशील राहण्याचा संदेश देण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मोटार वाहन निरीक्षक इंद्रजीत आमते यांनी केले.
कार्यक्रमात प्रमुख मान्यवर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता गावडे ,मोटार वाहन निरीक्षक सचिन आयरेकर,अनिल धात्रक, आणि इंद्रजीत आमते,कल्याण वाहतूक विभागाचे एएसआय आकाश चव्हाण,मोटर ड्रायव्हिंग स्कूल चालक-मालक आणि कर्मचारी,डीलरचे प्रतिनिधी, एनजीओ सदस्य व नागरिक उपस्थित होते.
.jpg)

Post a Comment
0 Comments