नव आयुक्त मनीषा आव्हाळे उल्हासनगर विकासाची आव्हानं पेलतील का?
कोलमडलेली प्रशासनास व राजकीय हस्तक्षेपास आवर घालतील का?
पहिल्या आयएएस महिला आयुक्तांकडुन नागरिकांच्या अनेक 'मनीषा'ब्लॅक अँड व्हाईट उल्हासनगर, प्रफुल केदारे :राजकीय हस्तक्षेप व प्रशासकीय उदासिनतेपुढे कोणताही आय ए एस आयुक्त उल्हासनगरात यायला धजावत नाही. साडेचार महिन्यांचे आयुक्त विकास ढाकणे यांनी दरम्यान अनेक प्रशासकीय धोरणांच्या पुनर्रचनेतुन शहराला वेग देण्याचा प्रयत्न केला. परंतु, शहराची ढासळलेली प्रतिमा व राजकीय दबावतंत्र यामुळे ढाकणे यांचे उल्हासनगरात मन रमेना. ढाकणे यांना मंत्रालयात उपसचिवपदी नियुक्ती मिळाली. आणि, नुकताच उल्हासनगर आयुक्त पदाचा कारभार मनीषा आव्हाळे यांनी स्वीकारलाय. या शहरातील कोलमडून पडलेली प्रशासकीय व्यवस्था आणि राजकीय हस्तक्षेपांवर मात करण्याचे मोठे आव्हान नवनियुक्त आयुक्त पेलतील का, हि उत्सुकता शहराला लागलीय.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय ढाकणे यांची बदली झाल्यानंतर आयुक्तपदाचा तात्पुरता कार्यभार अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे होता. मनिषा आव्हाळे या उल्हासनगरच्या पहिल्या महिला आयुक्त असल्याने शहर वासियांच्या त्यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. २०१८ मधील देशातील ३३ व्या क्रमांकावरील त्या आय ए एस आहेत. परंतु आगामी काळात या शहरात त्यांची परखड कार्यपद्धती पाहणे हे अपेक्षित ठरणार आहे.ज्यात, त्यांच्या पुढं शहरवासीयांच्या उडालेल्या मूलभूत सुविधांचा बोजवारा हे प्रामुख्याने मोठं आव्हान असेल. ठिक ठिकाणी खोदुन ठेवलेले खड्डे, धुराळा, क्षमता ओलांडलेले डंपिंग ग्राउंड,पाणी टंचाई, नगररचना, आरोग्य विभाग, सामन्य प्रशासन, कर, शिक्षण व मालमत्ता विभागातील बोकाळलेल्या भ्रष्टाचारावर अंकुश लावण्याचे शिवधनुष्य त्यांना पेलावे लागेल. प्रत्येक विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेलेले अधिकारी, अपात्रांना मिळालेले प्रभारी कार्यभार, अधिकार्यांच्या गैंग यांना आयुक्तांना धक्का द्यावा लागणार आहे.शहरातील अनधिकृत बांधकामे, वाहतूक कोंडी, प्लास्टिक माफियांना आळा घालणे, सार्वजनिक बांधकाम विभागातील सावळागोंधळ, माजी नगरसेवकांची मिलिभगत, कंत्राटी कामगारांचे शोषण, निविदा घोटाळे यांना नियंत्रित करून पारदर्शक प्रशासन देणारी अनेक आव्हानं मनिषा आव्हाळे यांच्या समोर उभी आहेत. आयुक्त या समस्यांना कसे तोंड देतात व शहराला विकासाची कशी दिशा देतात हे आगामी काळात स्पष्ट होईल.नवनियुक्त आयुक्तांच्या विभाग प्रमुखांना सुचना....* सर्व विभाग प्रमुखांनी अत्यावश्यक फाईली थेट आयुक्तांना पृष्ठ संख्या व महत्त्वपूर्ण मुद्यांसह ४ दिवस आधी सादर कराव्यात .* विभाग प्रमुखांनी पीपीटी द्वारे आपल्या विभागातील कर्मचारी संख्या, त्यांची कार्ये, योजना व त्यां पुढील समस्या निहाय माहिती द्यावी.* विभाग प्रमुखांनी आपल्या मासिक आणि साप्ताहिक जबाबदाऱ्या व योजनांचा तक्ता सादर करावा.* व्हाट्सअप ग्रुप वर एका समूहात एकच अधिकारी असावा, ज्यात कामकाजा व्यतिरिक्त पोस्ट नसाव्यात.* कार्यालयातील स्वच्छता, लेखा परीक्षण, अभिलेख आणि बैठक व्यवस्थेस प्राथमिकता दिली जावी.*आगामी ३ महिन्यात पालिकेचे ई- कार्यालय व्हावे.* सातत्याने होणारे विशेष सरकारी निर्णय व त्यांची अंमलबजावणी आयुक्त आणि विभाग प्रमुखांच्या निर्देशात काटेकोरपणे व्हावी.
Post a Comment
0 Comments