रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटी रौप्य महोत्सवी वर्ष 2024-25 शनिवार 18 तारखेला डोंबिवली पूर्वेकडील श्री गणेश मंदिर संस्थानच्या सभागृहात पार पडला पुरस्कार सोहळा..
ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर
डोंबिवली पत्रकार संघ अध्यक्ष शंकर जाधव यांना ज्येष्ठ पत्रकार तथा प्रकल्प प्रमुख रो.सुधीर जोगळेकर, प्रमुख पाहुणे कीर्ती वढालकर, क्लब अध्यक्ष रो. संजय मांडेकर, क्लब सचिव रो.आशिष देशपांडे यांच्या हस्ते रोटरी व्हेकेशनल एक्सिलन्स पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.डोंबिवली सामाजिक संस्था, पत्रकार, शिक्षक, उद्योजक, निवेदक, पर्यावरण संस्था यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
शंकर जाधव अध्यक्ष - डोंबिवली पत्रकार संघ यांचा परिचय
पदवी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर पत्रकारितेत आपलं करियर करण्याचे ठरविले,आणि त्या अनुषंगाने कै.गणा प्रधान यांच्या डोंबिवली एक्सप्रेस या साप्ताहिक मधून पत्रकारितेला सुरुवात केली. मग पुढे साथ मिळाली ती संदीप सामंत या समाजसेवकाची. त्याच्या बरोबर पत्रकारितेत काम करताना समाजसेवेची आवड निर्माण झाली. समाजसेवा करताना खारीचा वाटा तर उचलला. विकास काटदरे यांच्या सहकार्याने नवशक्ती वृतपत्रात काम मिळाले. तसेच सध्या दै. सागर वृत्तपत्रात अनेक वर्षापासून वृतसंकलन करत आहे. समाजसेवेचा पिंड असल्यामुळे,पत्रकारिता करताना 'इच्छा तिथे मार्ग' प्रमाणे अंध व्यक्तींसाठी काम करणाऱ्या संस्थेचा परिचय झाला.आणि समाजसेवेच व्रत सुरू झाले.यातूनच शंकर जाधव यांचे एकच स्वप्न आहे,की डोंबिवलीत अंध विद्यार्थ्यांकरता स्वतंत्र शाळा असावी.त्यासाठी त्यांचे विविध मार्गाने प्रयत्नही सुरू आहे.ईश्वर त्यांच्या ह्या प्रयत्नांना यश देवो हीच प्रार्थना.
Post a Comment
0 Comments