डोंबिवलीत आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार/आरोपीला अटक
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
एका आठ वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. या प्रकरणात पीडित मुलीचा कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केल्यांतर आरोपीच्या विरोधात गून्हा दाखल करून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वैभव जितेंद्र सिंग (१९) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीत पीडित मुलगी आपल्या कुटुंबीयांसह राहत आहे. आरोपी वैभव सिंग याची बहीण ट्युशन टीचर आहे. परिसरातील मुलं त्याच्या घरी ट्युशन घेण्यासाठी येत होते. 15 जानेवारी रात्री आठ वाजता पिडीत मुलगी आरोपी याचे घरी ट्युशनसाठी गेली होती, त्यावेळी घरात ट्युशन टीचर नव्हती. तेव्हा आरोपी वैभव याने पिडीत मुलीचा हात पकडून तिला बेडरूममध्ये घेवून गेला आणि बेडरूमची दरवाजाची कड़ी आतुन लावून पिडीत मुलीसोबत जबरदस्तीने बलात्कार केला. घटनेनंतर पीडित मुलगी आपल्या घरी गेली आणि घडलेल्या घटने बद्दल कुटुंबीयांना सांगितले. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी वैभव सिंग विरुद्ध गुन्हा दाखल केला, त्यानंतर पोलिसांनी ताबडतोड आरोपीला अटक करून तपास सुरु केला आहे.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी दिली.
.jpg)

Post a Comment
0 Comments