ब्लॅक अँड व्हाईट झिडके-अंबाडी वार्ताहर
भिवंडी-वाडा या रस्त्याचे गेल्या अनेक महिन्यांपासून काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे,भिवंडी तालुक्यातील झिडके-अंबाडी नाका " उड्डाणपूल भिवंडीकडे जाणाऱ्या ठिकाणी" रस्त्याचे जे पक्क्या स्वरूपाचे काँक्रिटीकरण झाले आहे,ते करताना रस्त्याची उंची सव्वा-दीड फुटाची जुन्या रस्त्यालगत ठेवल्यामुळे या रस्त्यावर मोटारसायकल,व अनेक प्रकारच्या वाहनांचे अपघात होऊन,मोठ्या प्रमाणात अपघात होणार आहेत,व माणसे आपले जीव गमावणार आहेत.या सार्वजनिक बांधकाम विभाग भिवंडीच्या नियमबाह्य व निष्काळजी कामकाजातविरोधात बांधकाम क्षेत्रातील जाणकार सामाजिक कार्यकर्त्य " मनसेचे तालुकाध्यक्ष " विकास जाधव यांनी सदर रस्त्याची प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहाणी करून आपली संतप्त भूमिका व्यक्त केलीआहे,सदर रस्त्यावर यापुढे एकही माणूस अपघातात मृत्यू झाल्यास सा.बां.विभाग यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात येईल याकरिता " मनसे" गांभीर्यपूर्वक दखल घेणार आहे,असे स्पष्टपणे विकास जाधव यांनी वृत्तप्रतिनिधींकडेआपली भूमिका व्यक्त केली आहे.
या परिसरातील नागरिकांकडून अशीही संतप्त प्रतिक्रिया आहे की,झिडके-अंबाडी नाका येथे 10 कोटी रूपयांचे अनुदान शुशोभिकरण करता आले असता,या अनुदानाचा गैरवापर झालेला आहे,तसेच प्लॅन,इस्टीमेंट नुसार अजिबात काम झालेले नाही,सदर 10 कोटी अनुदानाच्या कामाची निर्दोष पद्धतीने चौकशी करण्यात यावी की,जेणेकरून नागरिकांच्या मनात असलेली शंका दूर होईल,हे सा.बां.विभाग निसंकोचपणे करतील का? आजमितीस सा.बां.विभाग यांच्या नियमबाह्य कामामुळेच येथील स्थानिक रहिवाशांना पावसाळ्यात आपल्या घरात पावसाचे पाणी साचून जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान सहन करावे लागत आहे,रस्त्याचे काम करताना पूर्वापार शेतजमीनीतून वाहून जाणारे पाण्याचे मार्ग बंद केले आहेत.सद्यस्थितीत झिडके-अंबाडी नाका येथे चालू असलेल्या कामाबाबत नागरिकांकडून असणाऱ्या समस्यां प्रत्यक्ष पाहाण्यासाठी सा.बां.विभागाचे अधिकारी बोलावूनही येत नाहीत,ही मोठी शोकांतिका आहे.झिडके-अंबाडी येथे भिवंडी-वाडा रस्त्याचे जे सिमेंट काँक्रिटीकरण सुरू आहे त्यामुळे रस्त्याच्या लगत असणाऱ्या रहिवाशांचे धुळीमुळे त्यांना आपल्या घरात राहणे मुश्किल झाले आहे,त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या बाबी येथे रस्त्याचे काम करणारे ठेकेदार यांना सांगूनही दुर्लक्ष करीत आहेत याबाबत जबाबदारी कोण घेणार?असे असंख्ये प्रश्न याठिकाणी नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहेत,या कामाकडे कोणत्याही राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधीं वा कार्यकर्त्यांचे लक्ष नाही,याचे कारण ही बरीचशी मंडळी सा.बां.विभागाचे ठेकेदार व हितचिंतक आहेत.असे येथील नागरिकांचे स्पष्ट मत आहे.
तर या बेदखल कामाबाबत झिडके-अंबाडी येथील चालू असणाऱ्या या नियमबाह्य रस्त्याच्या कामासंबंधी सध्या व यापूर्वी केलेल्या कामाबाबत येथील स्थानिक नागरिक,बांधकाम विषयक जाणकार "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भिवंडी तालुका अध्यक्ष" यांनीच तीव्र संताप व्यक्त करून आपली भूमिका एका व्हीडिओमार्फत नागरिकांसाठी प्रसारित करून,यापुढे या रस्त्यावर अपघाताने मृत्यू होणाऱ्या घटनेला सा.बां.विभाग जबाबदार असणार आहे,व सदर विभागावर संबंधित पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याची ठाम भूमिका मनसे पक्षाची असल्याचे स्पष्टपणे जाहीर केले आहे. व एकप्रकारे सा.बां.विभागाला वेळीच दखल न घेतल्यास यापुढील घटनांना सामोरे जावे लागेल असा स्पष्ट निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments