डायमंड दुकानाला टाळे लागल्याने ठेवीदार भयभीत
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
मुंबईत दादर येथील टोरेस कंपनीबाहेर गुंतवणूकदारांनी गर्दी केली आहे. कंपनीनं दिलेल्या आश्वासनानुसार हप्ते मिळत नसल्याची तक्रार गुंतवणूकदारांनी केली आहे. कंपनीच्या योजनेत अनेकांनी लाखो रुपये गुंतवल्याची माहिती समोर आली आहे .मुंबईसह नवी मुंबई, मिराभाईंदर येथेही टोरेस कंपनीच्या कार्यालयाबाहेरही गुंतवणूकदारांनी गर्दी केली आहे. नवी मुंबईच्या कार्यालयावर तर गुंतवणूकदरांनी दगडफेक केल्याचाही प्रकार समोर आला आहे.
३ टक्के ते ११ टक्के असा परतावा मिळेल असं आमिष देऊन लोकांना गुंतवणूक करण्यास सांगून लोकांनी याच लालचेपोटी १० हजार ते १० लाख अशी गुंतवणूक केली. मात्र आता या कंपनीच्या दुकानाला टाळ लागल्याचे समजताच कल्याणमधील दुकानासमोर गुंतवणूकदारांनी गर्दी केली.
टोरेस नावाची आर्टिफिशल डायमंड विक्री करणारी कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची बातमी वाऱ्या सारखी सर्वत्र पसरली. नागरिकांना उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये गोळा करत गुंतवणूकदारांची फसवणूक करून पसार झाल्याची माहिती समोर आहे. नवी मुंबई, मीरा भाईंदर, दादर पाठोपाठ कल्याण मध्ये देखील टोरेसचे दुकान आज बंद असल्याचे निदर्शनास आल्याने गुंतवणूकदार घाबरले. आज कल्याण मधील टोरेसच्या दुकानासमोर शेकडो गुंतवणूकदार जमले. फसवणूक करणाऱ्या कंपनी मालकाने दुकान बंद केले आहे, त्यांचे फोन लागत नाही. आमची फसवणूक झाली आहे. या मालकावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी गुंतवणूकदार करत आहेत.
आम्हाला तुमचं व्याज नको. पण आम्ही गुंतवलेले पैसे तेवढे परत करा अशी मागणी गुंतवणूकदार करत आहेत. कंपनीमध्ये नागरिकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीकडून कोणतीच माहिती देण्यात येत नसल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. कंपनीचा मालक परदेशात वास्तव्याला असल्याचं सांगण्यात येत आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments