Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

राज्यभरातील तज्ज्ञ शिक्षकांना शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण


                       ब्लॅक अँड व्हाईट पुणे वार्ताहर 

सिंहगड इंजिनियर कॉलेज कुसगाव बुद्रुक लोणावळा येथे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण संपन्न होत असून या प्रशिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० त्याची शैक्षणिक वर्षात होणारी अंमलबजावणी, राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२० पायाभूत स्तर २०२३ शालेय शिक्षण २०२४ ची सविस्तर माहिती देऊन चर्चा करण्यात येत आहे यावेळी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा प्रस्तावना व संरचना क्षेत्र क्रमांक १ ते ६ व परिशिष्ट २ ते २ याविषयी महत्त्वपूर्ण बदल सांगितले आहेत क्षमता आधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया व मूल्यांकन कार्यान्वित आणि क्षमता आधारित प्रश्न प्रकार व प्रश्न निर्मिती कौशल्य विचार प्रवर्तक प्रश्न, नवीन समग्र प्रगती पत्रक स्तरनिहाय व त्यात बदल नवीन मूल्यमापन पद्धतीत बदल या विषयावर सखोल मार्गदर्शन घेण्यात येऊन या प्रशिक्षणाचे राज्यस्तरीय ५ दिवसीय प्रशिक्षण पूर्ण होत आहे.  जिल्हास्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शकांची टीम तयार करण्यात आली आहे व ते  तालुकास्तरावर तयार होणारे तज्ज्ञ मार्गदर्शक ५ दिवस प्रशिक्षण हे तालुकास्तरावर देण्यासाठी मार्गदर्शक म्हणून राहतील वर्ग १ ते ५ प्राथमिक गट व वर्ग ६ ते १२ माध्यमिक गट व उच्च माध्यमिक गटामधून सर्व शिक्षकांना हे प्रशिक्षण घेणे बंधनकारक असणार आहे. दोन गटात हे प्रशिक्षण दिले जाणार आहेत या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात होणारे बदल आव्हानांना समोर जाण्यासाठी विद्यार्थी तयार करणे तशी अध्ययन अध्यापन प्रक्रियेत बदल करावा लागणार आहे त्यातून शिक्षकांचे सक्षमीकरण या प्रशिक्षणातून प्रत्यक्ष वर्गामध्ये प्राप्त नवीन ज्ञानाचा आणि कौशल्यांचा उपयोग करताना व विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी मदत होईल असे मत राहुल रेखावार संचालक राज्य शैक्षणिक संशोधन आहे. व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी व्यक्त केला आहे हे प्रशिक्षण देण्यासाठी डाएटचे अधिव्याख्याता व एस.सी. आर. टी. चे ज्येष्ठ अधिव्याख्याता यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून विशेष मेहनत घेतली या राज्यस्तरीय प्रशिक्षण घेण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील  माध्यमिक विभागातून 9 व प्राथमिक विभागातून 9 अशा 16 शिक्षकांची निवड राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी झाली आहे. सदर प्रशिक्षण महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षकांना दिले जाईल. ठाणे जिल्ह्या करिता प्रशिक्षणासाठी ठाणे डायट प्राचार्य श्री संजय वाघ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातून माध्यमिक विभागातून डॉ. दिनानाथ पाटील, श्री. भूपेन्द्र महाजन, श्रीम. प्रज्ञा बापट, श्रीम. योगिता पाटील, श्री. देवेंद्र पाटील, श्री. बालाजी घुगे, श्रीम. सुमन बंडगर, श्री. सुनिल शर्मा, श्री. श्याम शेलार व प्राथमिक विभागातून श्रीम हर्षल साबळे, श्रीम सुदर्शना शिरुडे, डॉ. सुनीता बेडसे, श्रीम संगीता भेरे, डॉ शुभांगी गादेगावकर, श्री अजितकुमार गायकवाड, श्री शहाबुलक सिद्दीकी यांची निवड झाली आहे.

Post a Comment

0 Comments