ठाणे आयुक्तालय परिमंडळ कल्याण 3 अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाची कारवाई
विष्णूनगर पोलीस स्टेशन हद्दीमधून तीन किलोहून अधिक गाज्यांच्या साठासह एकजण अटकेत
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
विष्णू नगर पोलीस स्टेशन हद्दीत सिद्धार्थ नगर ऐश्वर्या हॉटेल जवळ डोंबिवली पश्चिम येथे एक इसम गांजा हा अमली पदार्थ विक्री करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याने त्या अनुषंगाने परिमंडळ तीन हद्दीत कारवाई करण्याकरता नेमलेल्या पथकातील सब इन्स्पेक्टर चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल गौतम जाधव, पोलीस कॉन्स्टेबल गुजर, पोलिस कॉन्स्टेबल सोनवणे यांनी धडाडीने कारवाई करून, गांजा विक्री करणारा नाव.. लीलाधर सुरेश ठाकर वय 35 वर्ष राहणार कोपर क्रॉस रोड सिद्धार्थ नगर हनुमान मंदिरा शेजारी डोंबिवली प .याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एकूण 80,175/- रुपये किमतीचा 3207 ग्रॅम चला वजनाचा गांजा सापडला आहे. अमली पदार्थ विक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने त्याच्यावर विष्णू नगर पोलीस स्टेशन मध्ये एन डी पी एस ऍक्ट 8(क), 20(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे आयुक्तालय परिमंडळ 3 क्षेत्रातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या कारवाईत सन २०२५ मध्ये जानेवारी महिन्यात अंमली पदार्थ ताबा अंतर्गत ८ गुन्हे दाखल असुन सदर गुन्हयात १३ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांचेकडुन ४४ ग्रॅम एम.डी. पावडर, २३२ कोडीनयुक्त बॉटल, व ५ किलो ९२२ ग्रॅम गांजा असा एकुण ३,५५, ३७५ रुपये किमतीचा अंमली पदार्थ मुद्देमाल हस्तगत केला आहे.आणि अंमली पदार्थांच्या विरोधात ही कारवाई अशीच यापुढेही सुरूच राहणार आहे असे उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments