ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि रेगे दीक्षित सायन्स अकॅडमी यांचे वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश आणि विज्ञान विषयावरील मॉडरेटिंग व्याख्यान कल्याण येथे के. सी. गांधी हायस्कूल आणि ब्राह्मणसभा डोंबिवली येथे संपन्न झाले. चाळीस वर्षाहून अधिक काळ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मुख्याध्यापिका आणि समुपदेशक शैलजा मुळ्ये यांनी इंग्लिश विषयावर तर विद्यार्थीप्रिय प्राचार्य आणि मार्गदर्शक विनोथ बालसुब्रमण्यम यांनी सायन्स विषयावर विद्यार्थ्यांना मॉडरेटिंगविषयी सखोल मार्गदर्शन केले. पेपर सोडवताना कोणती काळजी घ्यायची , गुण कुठे जाऊ शकतात , कोणत्या कुप्त्या वापरायच्या आदी अनेक मुद्द्यांवर सखोल प्रकाश टाकला. कल्याण डोंबिवली परिसरातील ७५ हून अधिक शाळांमधील १२०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. गेल्या १० वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा होत असून शेकडो विद्यार्थ्यांनी अव्वल गुण प्राप्त केले आहेत. या प्रसंगी प्रा शैलेश रेगे लिखित शुअर शॉट जॉमेट्री या पुस्तकाचे विनामूल्य वितरण करण्यात आले. प्रा गजेंद्र दीक्षित यांनी या उपक्रमाचा उद्देश समजावून सांगितला तर प्रा शैलेश रेगे यांचे हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा सारिका रेगे,हितेश वडगामा ,सुधीर राजगुरू, प्रथमेश बेळे, सनथकुमार राऊत, केदार राणे, गौरवी बेळे, मृणाल ठोसर सागर सर, हेमंत नेहते सर यांचे विशेष सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ योगेश जोशी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देत 10 वी नंतर विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात येईल असे सांगितले.
Post a Comment
0 Comments